Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडमुख्यमंत्री ठाकरे, अशोक चव्हाण! वडेट्टीवारसारख्या बोगस मंत्र्यांना रोखा गायकवाड आयोगाचा अहवाल खरा...

मुख्यमंत्री ठाकरे, अशोक चव्हाण! वडेट्टीवारसारख्या बोगस मंत्र्यांना रोखा गायकवाड आयोगाचा अहवाल खरा की खोटा सांगा!-आ.मेटे


बीड (रिपोर्टर):हे लोक ओबीसी आरक्षणावर डल्ला मारणारे आहेत. गायकवाड आयोग अहवाल बोगस आहे. या अहवालाचा निषेध करतो या भाषेत राज्याचे आदिवासी व सहाय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाषा केली असून गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस आहे का? हे ना.अशोक चव्हाण यांनी जाहिर करावं, हा अहवाल बोगस नसल तर हा बोगस मंत्री अशी भाषा का करतो असा सवाल विचारत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते लोक महाराष्ट्रात भांडण लावत असल्याचे म्हटले.
काल जालना येथे ओबीसीचा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात राज्याचे अदिवासी व सहाय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केले ते अतिशय निषेधार्ह्य असल्याचे सांगत शिवसंग्रामचे सर्वासर्वे आ.विनायक मेटे यांनी वडेट्टीवार यांच्यासह अशोक चव्हाणांवर हल्लाबोल चढवला. काल विजय वडेट्टीवार म्हणाले हे लोक ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारणारे आहेत, गायकवाड अहवाल बोगस आहे, त्या अहवालाचा मी निषेध करतो ही जी विजय वडेट्टीवार यांची भाषा आहे ती जबाबदार मंत्र्याला शोभणारी नाही. सुसंस्कृत महाराष्ट्राला लाज आणणारी आहे असं म्हणत मेटे यांनी आपली भुमिका स्पष्ट करत माझं स्पष्ट म्हणणं आहे ना.अशोक चव्हाण यांनी याबाबत भुमिका स्पष्ट करायला हवी. गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस आहे कीचांगला आहे हे त्यांनी जाहीर करावं, जर बोगस नाही तर हा बोगस मंत्री अशी बोगसगिरीची भाषा का करतो? त्यांना इथे भांडणे लावायची आहेत का? खरं तर विजय वडेट्टीवार भांडणे लावण्याचे काम करत आहेत अशा मंत्र्यांना रोखण्याचे काम कॉंग्रेस आणि मुख्यमंत्र्यांनी करावं असं आ.विनायक मेटेंनी म्हटलं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!