Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडबीड पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपदक

बीड पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपदक


बीड (रिपोर्टर):-
गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या धडक कारवाईबद्दल
बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना शौर्यपदक जाहीर झाले.
पोलीस दलात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध पदकांनी गौरविण्यात येते.
शौर्यपदक या पदकासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांची निवड झाल्याने बीड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गडचिरोली येथील सिरोंचामध्ये २०१८मध्ये नक्षलवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आर.राजा यांच्या नेतृत्वाखाली १५ कर्मचाऱ्यांची दोन पथके कारवाईसाठी गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यात तीन पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आर. राजा व सहकाऱ्यांनीही गोळीबार केला. यामध्ये तीन नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचा निशाणा ठरले होते. या शौर्याबद्दल आर. राजा यांना शौर्यपदक जाहीर झाले आहे.

Most Popular

error: Content is protected !!