Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडपंचशीलनगर मधील रस्त्याचे होवू लागले निकृष्ट काम-वडमारे

पंचशीलनगर मधील रस्त्याचे होवू लागले निकृष्ट काम-वडमारे


बीड (रिपोर्टर): पंचशील नगर दलित वस्ती मार्गे जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी गुट्टे यांनी झोपेचं सोंग घेतलेला आहे रस्त्या कामाला सुरुवात झाल्यानंतर श्रेय घेणारे नगरसेवक आणि इतर पक्षातील कार्यकर्ते बोगस काम थांबवण्यासाठी का प्रयत्न करत नाहीत केके वडमारे बीड
शिवाजीनगर पंचशील नगर दलित वस्ती मार्गे जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम जाणून-बुजून दोन वर्षापासून बंद ठेवले होते प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवून वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरवठा करून आमच्या सहकार्‍यांच्या माध्यमातून पंचशील नगर मित्र मंडळाच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ आणि माता भगिनींच्या पाठपुरवठा नंतर या कामाला सुरुवात झाली आहे दलित वस्ती कडे जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना हा रस्ता गुणवत्तेचा व्हावा असं वाटत नाही कारण एरवी पन्नास हजाराच्या दुरुस्तीचे काम चालू असेल तर त्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी दिवसभरामध्ये चार-पाच वेळेस उपस्थिती लावतात परंतु दलित वस्ती कडे जाणार्‍या कोरडा रुपये निधी असलेल्या रस्त्याकडे अधिकारी-कर्मचारी फिरकायला तयार नाहीत या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे दिवसाढवळ्या रस्त्यासाठी आलेल्या करोडो रुपयांचा निधी हडपण्याचा डाव अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गुत्तेदार करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता उपअभियंता ज्युनिअर इंजिनिअर याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे जिल्हाधिकारी यांना विनंती आहे या रस्त्याचे होत असलेले बोगस काम थांबून गुत्तेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नगरपालिकेचे कर्मचारी मुख्य अधिकारी यांना तातडीने सूचना देऊन संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना करून निकृष्ट दर्जाचे काम थांबून कॉलिटी काम करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात अन्यथा या रस्त्याचे बोगस काम आम्ही होऊ देणार नाहीत तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सुद्धा नागरिकांनी वयोवृद्ध माता-भगिनी बोगस काम थांबवण्यासाठी सहकार्य करावे पंचशील नगर कृती समिती बीड सामाजिक कार्यकर्ते केके वडमारे अशोक जावळे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात यांनी म्हटले आहे

Most Popular

error: Content is protected !!