Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईम‘त्या’ टेम्पोत फक्त दहा पोते गुटखा, पेठ बीड पोलीसांची कारवाई संशयाच्या भोवर्‍यात

‘त्या’ टेम्पोत फक्त दहा पोते गुटखा, पेठ बीड पोलीसांची कारवाई संशयाच्या भोवर्‍यातबीड (रिपोर्टर):- पेठ बीड पोलीसांनी २५ तारखेला गुटख्याने भरलेला टेम्पो पकडला होता. तो थेट कारवाईसाठी ठाण्यात आणण्याऐवजी तेथेच त्याची झाडाझडती सुरू केली. यावेळी टेम्पो चालकाने पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळ काढला. यानंतर वरिष्ठांनी त्यात लक्ष घातल्याने पोलीसांनी मोकळा टेम्पो पकडून आणला. मात्र पुन्हा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पेठ बीड पोलीसांना खडसावल्यानंतर रात्री पोलीसांनी १० पोते गुटखा जप्त केला. त्यामुळे एकूण पोलीसांच्या कारवाईबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
पेठ बीड पोलीसांनी तेलगाव नाका येथे माजलगावहून येणार्‍या टेम्पो क्र.एम.एच.१६ एवाय ८०३५ ला अडवल्यानंतर त्याची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलीसांनी तो टेम्पो ठाण्यात आणण्याऐवजी एका लॉन्सच्यापाठीमागे नेला. तेथे बराच वेळ चर्चा झाल्यानंतर टेम्पो घेवून चालक फरार याची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर पुन्हा पोलीसांनी रिकामा टेम्पो ठाण्यात आणून लावला. त्यानंतर चालक आणि मालकांला पोलीसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांनी गुटका लपुण ठेवल्याचे सांगितले. घोडका राजुरी परिसरातील एका खदाणीतून १० पोते गुटखा जप्त केला. त्याची एकूण किंमत १ लाख ३६ हजार रूपये आहे. मात्र सुरूवातीला पोलीसांनी जेंव्हा टेम्पो जप्त केला होता तेंव्हा तो गुटख्याने भरलेला होता. मात्र त्यामध्ये केवळ १० च पोते पोलीसांनी जप्त केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीसांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!