बीड (रिपोर्टर) पाणीपुरवठ्यातील भ्रष्टाचार प्रकरणात शिवाजी चव्हाण यांनी आप्तस्वक यांनाच टेंडर देऊन स्वतःचे उकळ पांढरे करून घेण्याचा प्रताप केला आहे याप्रकरणी त्याची उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी एक निवेदनाद्वारे नगरसेवक रमेश चव्हाण यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या टेंडर मध्ये मुलगा मुलगी पुतण्या यांना त्यांनी कोट्यावधीची,कामे वाटली आहेत, व जाणीवपूर्वक जवळच्या व्यक्तींनाच ती टेंडर दिली आहेत त्यामध्ये शिवाजी चव्हाण यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे असे दिसून येत आहे परंतु याच्या खोलात जाऊन चौकशी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक चव्हाण यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून टेंडर क्लर्क जवान यांनी अशा कितीतरी प्रकरणांना स्वतःच्या जवळच्या माणसांना देऊन आपले घर भरले आहे असा घनाकती आरोप नगरसेवक चव्हाण यांनी केला आहे चौकशीत सर्व काही उघड होईल त्यामुळे त्याची खाते निवांत चौकशी करून भ्रष्टाचार संपण्यासाठी शासनाने पुढे यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना देखील याविषयी कळवण्यात येणार असल्याची असल्याची त्यांनी यावेळी पत्रातून सांगितले आहे.