Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमसोने चोरणार्‍या महिलांची टोळी गजाआड

सोने चोरणार्‍या महिलांची टोळी गजाआड


बीड (रिपोर्टर):- बसमध्ये गर्दीचा फायदा घेवून बॅगमधील आणि महिलांच्या गळ्यातील सोने चोरणार्‍या महिला टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला असून दोन महिलांना ताब्यात घेतले आहेत.
स्थानिग गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिला सोनी चव्हाण, राणी चव्हाण या प्रवाशांचे चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी व्हेरना कार क्र.एम.एच.१२ जे.यु. ४५०० या गाडीतून गेवराईहून बीडकडे येत असल्याची माहिती मिळताच जालना रोडवरील संगम हॉटेलसमोर पोलीस पथकाने सापळा लावून त्या गाडीला थांबवले असता. त्या गाडीतील चालक गाडी सोडून पळाला. त्यामध्ये सोनी उर्फ पप्पू जावेद चव्हाण रा.नागझरी ता.गेवराई जि.बीड व दुसरी महिला रोहिणी शहादेव चव्हाण रा.बांगरनाला बालेपीर बीड या दोन महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असता. त्यांच्याकडे एक सोन्याचे गंठण, एक पट्टीचे गंठण व एक मनीमंगळसुत्र असे एकूण १ लाख ६५ हजाराचे सोने मिळून आले. याबद्दल पोलीसांनी त्यांना विश्‍वासात घेवून विचारले असता. त्यांनी सांगितले की, हे दागिने त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी नेकनूर बसस्थानक, पाच-सहा दिवसापूर्वी मांजरसुंबा ते बीड बस प्रवासात, पंधरा दिवसापूर्वी धारूर बसस्टँड येथे चोरल्याचे सांगितले व दहा ते पंधरा दिवसापूर्वी धारूर ते माजलगाव एस.टी.बस प्रवासात माजलगाव ते तेलगाव बस प्रवासात देखिल काही महिलांच्या दागिने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.सदरील कार ही चोरी करण्यास जाण्या-येण्यासाठी घेतल्याचे सांगितले. याबाबत पोलीसांनी चौकशी केली असता नेकनूर पोलीस, पेठ बीड पोलीस, धारूर पोलीस, माजलगावसह आदी ठिकाणी महिलांचे सोने गेल्याच्या तक्रारी दाखल आहेत. पोलीसांनी सदरील सोने व कार असा एकूण ७ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही महिला आरोपींना नेकनूर पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्था.गु.शा.चे पी.आय.भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!