Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडबीड, अंबाजोगाईत किसान बाग आंदोलन

बीड, अंबाजोगाईत किसान बाग आंदोलन


बीड, अंबाजोगाई (रिपोर्टर):- केंद्र सरकारने तीन कृषीविधेयक बिल पारित केले. ते बिल मागे घेण्यात यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना दाद द्यायला तयार नाही. या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच अनेक मुस्लिम संघटनेच्या वतीने जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आलेअसून त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग असे या आंदोलनाचे स्वरूप आले आहे.
केंद्रात सत्तेवर आलेले भाजपा सरकार मनमानी कारभार करीत असून देश विरोधी कायदे तयार करीत आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे. सीएए व एनआरसी हे त्यापैकीच तयार करण्यात आलेले कायदे आहेत. याला देशातील अनेक नागरिकांनी विरोध केलाय. आता केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी कायदे केले असून नुकतेच तीन कृषी विधेयक बिल पास केले आहे. त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य शेतकरी मात्र या कायद्यामुळे अडचणीत आला आहे. कृषी विधेयक बिल मागे घेण्यात यावे म्हणून गेले दोन महिने शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार हे बिल मागे घेण्यास तयार नाही. यापूर्वी शाहीन बाग आंदोलनात सर्व धर्मियांनी सहभाग घेऊन मोठे आंदोलन केले होते. आजही कृषी विधेयक बिला विरोधात आंदोलन चालू असून शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करण्याचा आले आहे या आंदोलनास मुस्लिम संघटनांनी दिला असून त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या जानेवारी रोजी राज्यातील विविध भागात, संपूर्ण जिल्हाभर आणि अंबाजोगाई येथेही हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मुस्लिम समाजातील लोकांनी , शेतकर्‍यांनी, वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान बीड येथेही आंदोलन सुरू झाले. यावेळी अशोक हिंगे, शिवराज बांगर, फारूक पटेल, शेख शफिकसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!