Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडतीच गर्दी, तोच जोश आणि तोच कामाचा धडाका! धनंजय मुंडे पुन्हा 'फॉर्मात'!

तीच गर्दी, तोच जोश आणि तोच कामाचा धडाका! धनंजय मुंडे पुन्हा ‘फॉर्मात’!

अडचणीच्या काळात जिल्हावासीयांनी दिलेलं प्रेम म्हणजे भगवंताचा आशीर्वाद – धनंजय मुंडे झाले भावुक
बीड : खोटेनाटे आरोप, त्यातून झालेला मनस्ताप आणि बदनामी झुगारून टाकत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अवतीभोवती पुन्हा तीच गर्दी, मुंडेंचा कामांचा धडाका आणि त्यातला जोश नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा बीड जिल्हा वासीयांना आज पाहायला मिळाला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभासाठी आज ना. मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 
धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयात ध्वजारोहण करत शासकीय मानवंदना स्वीकारली, त्यानंतर जिल्हावासीयांना शुभेच्छा संदेश दिला, यावेळी कोव्हिड लसीकरण मोहिमेसह जिल्ह्यातील चालू व प्रस्तावित विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडला. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामस्वामी यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाल्याबद्दल ना. मुंडेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.
एका महिलेने केलेल्या खोटरड्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसात धनंजय मुंडे यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला होता, परंतु त्या आरोपांमध्ये काहीही निष्पन्न झाले नाही, उलट तक्रारदार महिलेनेच दिलेली तक्रार मागे घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी, कार्यकर्ते, समर्थकांनी या कठीण काळात मोलाची साथ दिली, विश्वास व्यक्त केला तसेच सबंध जिल्हा पाठीशी उभा राहिला, लोकांचे हे प्रेम, आशीर्वाद म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा प्रसाद असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांनी शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक न्याय भवन परिसरात विविध आंदोलन व उपोषणकर्ते यांच्या भेटी घेतल्या. संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रम शाळा वडझरी ता. पाटोदा यांच्या कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सोडवत येत्या दोन दिवसात सदर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश त्यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना दिले.
चारा छावणी धारकांच्या थकीत देयकांसबंधीच्या उपोषणास भेट देत, त्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
वंचित बहुजन आघाडी प्रणित गायरान हक्क आंदोलनास सामाजिक न्याय भवन परिसरात भेट दिली; ‘हा माझ्या विभागाचा विषय आहे, मला येऊन भेटला असतात तर वयोवृद्ध व्यक्तींना, माय माऊल्यांना पायी आंदोलन करत दूरवरून येण्याची वेळ येऊ दिली नसती’ असे म्हणत आंदोलकांचे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले, यावेळी आंदोलकांनी हार घालून धनंजय मुंडे यांचा सत्कार केला. दै. मराठवाडा साथी कार्यालयास भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या आसावरी बुकसेलर्स या पुस्तकालयास भेट दिली. दिशा कंप्युटर इन्स्टिट्यूट या अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही ना. मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 
*जनता दरबार आणि गाडीच्या बोनटवरून दिले आदेश!*
विविध कार्यक्रमानंतर विश्राम गृह येथे शेकडोंच्या गर्दीत नेहमीप्रमाणे जनता दरबार घेत धनंजय मुंडे यांनी आलेल्या सर्वांची निवेदने स्वीकारली. यावेळी मुंडेंनी चक्क विश्रामगृहाच्या दारात, गाडीच्या बोनटवर निवेदनांवर स्वाक्षरी करून संबंधितांना आदेश निर्गमित केले. लोक भेटतील तिथे जनता दरबार व ऑन द स्पॉट निर्णय ही मुंडेंच्या कामाची लोकप्रिय शैली आज पुन्हा अनेकांना अनुभवायला मिळाली.
*गावोगाव सत्कार*बीड येथून लोणी ता. शिरूर कासार येथे संत खंडोजीबाबा यांच्या स्मृती सप्ताहास भेट द्यायला निघालेल्या मुंडेंचे रस्त्यातील प्रत्येक गावात स्थानिक नागरिक व समर्थकांनी जंगी स्वागत केले. शिरूर कासार शहरातील प्रमुख चौकात तर जेसीबीने फुले उधळत व क्रेन ने शेकडो किलोचा हार घालून समर्थकांनी मुंडेंचे जंगी स्वागत केले. 
गावोगावचे सत्कार स्वीकारत खोकरमोह येथे स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण ना. मुंडेंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावकऱ्यांचे व जिल्हावासीयांचे आभार मानत, गावातील संत भगवान बाबा यांच्या मंदिर उभारणी साठी निधी उपलब्ध करून देण्याचा धनंजय मुंडे यांनी शब्द दिला. 
लोणी (वारणी) ता. शिरूर कासार येथील संत खंडोजी बाबा यांच्या 17व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या प्रसंगी उपस्थिती दहीहंडी फोडून ना. मुंडेंनी उपस्थितांना संबोधित केले. 
संत खंडोजीबाबा यांनी २००२ साली माझ्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवला होता, आज तेच प्रेम, तीच माया व तेच आशीर्वाद या परिसरातील नागरिकांनी मला दिले, या ऋणात कायम राहीन, असा शब्द देताना धनंजय मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Most Popular

error: Content is protected !!