Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावसुंदररावजी सोळंके कारखान्याकडून ऊसाचे बील बँकेत वर्ग

सुंदररावजी सोळंके कारखान्याकडून ऊसाचे बील बँकेत वर्ग

माजलगांव, (रिपोर्टर) :- चालु गळीत हंगाम २०२०-२१ मधील १५ जानेवारी २०२१ अखेर गाळप केलेल्या ऊसासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम प्रती टन रुपये १८८५ / – प्रमाणे संबंधीत ऊस उत्पादक सभासदांचे बँक खाती आज दि .२७ रोजी वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री.धैर्यशीलकाका सोळंके यांनी दिली . सन.२०२०-२१ गाळप हंगामामध्ये दि .२६ / १ / २०२१ अखेर एकुण ९ ० गाळप दिवसामध्ये ४१३१०० मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी ९ .५७ टक्के साखर उता – याने २७८८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे . याबरोबरच डिस्टलरी प्रकल्पाचे माध्यमातुन आजअखेर ५१८७ ९ २० लिटर रेक्टीफाईड स्पीरीटचे उत्पादन घेवुन ४४८१३२३ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतलेले आहे . तसेच को.जन प्रकल्पातुन आजअखेर २११३६ ९ ३२ युनीट विज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीस विक्री केलेली आहे .

Most Popular

error: Content is protected !!