Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडभेंडखुर्द/सुलतानपूर ग्रामपंचायतचा आदर्श सैन्यात भरती झालेल्या जवानाच्या हस्ते झेंडावंदन

भेंडखुर्द/सुलतानपूर ग्रामपंचायतचा आदर्श सैन्यात भरती झालेल्या जवानाच्या हस्ते झेंडावंदन


बीड (रिपोर्टर)- विविध राजकीय व्यक्ती झेंडा वंदनासाठी प्रसंगी भांडणेही करतात. आपल्याच हाताने झेंडावंदन व्हावे, किंवा आपल्याला झेंडावंदनाचा मान मिळावा म्हणून कित्येक व्यक्ती प्रयत्न करतात. मात्र गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द-सुलतानपूर येथील सरपंचाने स्वत:च्या हस्ते झेंडावंदनाचा हक्क असताना या गावातील नुकतेच सैन्यामध्ये भरती झालेल्या युवकांच्या हस्ते झेंडावंदन करून राजकारणी आणि तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
येथील सरपंच अश्‍विनी धनेश्वर खेत्रे हे या पहिल्यांदाच गावच्या सरपंच झाल्या आहेत. मात्र गावातील लोकांनी इतर युवकांसमोर आदर्श निर्माण करावा आणि आपणही त्यामध्ये सरपंच या नात्याने योगदान द्यावे, म्हणून या गावातील अमोल भीमराव उगले हा नुकताच सैन्यामध्ये भरती झालेला जवान आहे. अमोलला २६ जानेवारीचा झेंडावंदनाचा मान दिल्याने गावात आणि आसपास नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याने कौतुकाची थाप मिळत आहे.

Most Popular

error: Content is protected !!