Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeमोबईलसरकारला शेतकर्‍यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायचीये-संजय राऊत

सरकारला शेतकर्‍यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायचीये-संजय राऊत

मुंबई (रिपोर्टर)-शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आज गंभीर आरोप केला. सरकारला आता यापुढे शेतकर्‍यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायची आहे असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.


यावेळी संजय राऊत म्हणाले, सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्‌यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्धू वैगरे लोकं आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा. ते कुठं फरार झालेले आहेत? पण सरकारला आता यापुढे शेतकर्‍यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे आणि त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गट जो भाजपाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्‌यावर गेले. त्यांनी गदारोळ निर्माण केला आणि आज जे सगळं चित्र निर्माण झालं आहे, परत की आंदोलनात फूट पडली. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकर्‍यांना पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे, करून घ्या. संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसांपासून या सरकारला सर्व प्रश्नांचा उत्तर द्यावी लागतील.

Most Popular

error: Content is protected !!