Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडवेतनासाठी आश्रमशाळा शिक्षकांचे उपोषण

वेतनासाठी आश्रमशाळा शिक्षकांचे उपोषण


बीड (रिपोर्टर)- सहायक आयुक्त समाजकल्याण बीड यांनी वेळोवेळी पत्र देऊनही मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा वडझरी ता. पाटोदा यांनी शिक्षकांचे फेब्रुवारी ते मार्च २०२० व जून २०२० ते आजपर्यंतचे वेतन अदा न केल्याने २५ जूनपासून शिक्षक सामाजिक न्याय भवन बीड येथे उपोषणाला बसले असून अद्यापपर्यंत या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही.


शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सहायक आयुक्त समाजकल्याण बीड यांनी वेळोवेळी पत्र देऊनही मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे वेतन रखडवले आहे. या संदर्भात १४ जानेवारी रोजी सहायक आयुक्त समाजकल्याण, बीड यांना वेतन अदा करण्यासाठी निवेदन दिले होते मात्र तरी देखील शिक्षकांचे वेतन न दिल्याने शिक्षकांनी सामाजीक न्याय भवन बीड येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

बदली होऊन आलेल्या प्राथमिक शिक्षकांचेही जि.प.समोर उपोषण
मे महिन्यामध्ये राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार बीड जिल्हा परिषदेला इतर जिल्ह्यातून काही प्राथमिक शिक्षक बदली होऊन आलेले आहेत मात्र बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षक असल्याने शिक्षण विभाग त्यांना रुजू करून घेत नसल्याने २६ जानेवारीपासून हे शिक्षक बीड जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!