Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडइमामपूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवले आजपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात रस्त्यासाठी

इमामपूर रस्त्यावरील अतिक्रमण हटवले आजपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात रस्त्यासाठी

‘आम आदमी’ने केले होते आंदोलन
बीड (रिपोर्टर)- इमामपूर रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली. या रस्त्यावरील अतिक्रमण आज सकाळी उठवण्यात आले. रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली. अतिक्रमण हटवल्यामुळे रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला.
बीड ते इमामपूर या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले होते. रस्त्याअभावी या परिसरातील नागरिकांचे हाल होत होते. रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने रस्त्यावरच आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांची अनेक दिवस नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नव्हती मात्र आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम होते. जवळपास सहा दिवस रस्त्यावर आंदोलन सुरू होते. शेवटी आंदोलनकर्त्यांच्या मागणीची दखल नगरपालिकेला घ्यावी लागली. आज सकाळपासून रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यामुळे रस्ता मोकळा दिसत आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने या भागातील नागरिकात समाधान व्यक्त केले जात आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!