Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईचुलत्यांमुळे लागली सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय - अजित पवार

चुलत्यांमुळे लागली सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय – अजित पवार


मुंबई (रिपोर्टर)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं आवर्जून सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय आमच्या चुलत्यांची (शरद पवार) यांची. ते २७ वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. आज त्यांचं वय ८० वर्ष पूर्ण असून सकाळ पासून काम करत असतात अस अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले की, सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची लागली आहे. आम्ही जस बघतोय तस चुलते २७ वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले तरी सकाळी सात ला काम सुरूच. आता वय वर्ष ८० पूर्ण झालं. तरी देखील आजही सकाळ पासून कस साहेब काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो अस अजित पवार म्हणाले.
पेट्रोल भरणार्‍यांनो नाउमेद होऊ नका, धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केलय
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनोख्या पद्धतीने पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना शुभेच्छा देत पेट्रोल सोडणार्‍यांनो तुम्ही नाउमेद होऊ नका. धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केलय. नंतर, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. आपल्याला सर्वात श्रीमंत नाही व्हायचं. पण, पुढं आपलं बर होईल अशा शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून अस म्हणत चांगलं काम करा असा सल्ला त्यांनी कर्मचार्‍यांना दिला.

Most Popular

error: Content is protected !!