Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमशुभकल्याणचा फरार आरोपी गजाआड

शुभकल्याणचा फरार आरोपी गजाआड


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील शुभकल्याणच्या विविध शाखेमधील ठेवीदारांना लाखोंचा गंडा घालून फरार असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने केजमधून मुसक्या आवळल्या असून त्याला नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुभकल्याण मल्टिस्टेटमध्ये २०१८ साली अनेक ठेवीदारांना पैसे परत न दिल्याने आणि बँक तोट्यात आल्याने ठेवीदारांनी नेकनूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ७१/२०१८ कलम ४२०, ४०६, ४६७, १२० (ब) भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी अभिजीत बालासाहेब सादे (रा. मंगळवार पेठ, केज) हा फरार होता. काल स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय आनंद कांगुणे यांनी त्याच्या केजमधून मुसक्या आवळत त्याला नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्तानिक गुन्हे शाखेचे ए.एस. कांगुणे, खेडकर, तांदळे, ठोंबरे, शिंदे, हारके यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!