Home क्राईम क्राईम डायरी- दागिणे, पैसे, लंपास करणारी लुटारु महिलांची टोळी पुन्हा पुन्हा सक्रीय

क्राईम डायरी- दागिणे, पैसे, लंपास करणारी लुटारु महिलांची टोळी पुन्हा पुन्हा सक्रीय


बसमध्ये एकट्या प्रवाशी महिलेसोबत बसून तिच्याशी जवळीक करत तिच्या बॅग मधील सोने लंपास करणे, एकाद्या महिलासोबत बाळ असेल तर तिच्या बाळाला घेवून तिच्याशी जवळीक करत तिच्या गळ्यातील अन् बॅगमधील सोन लंपास करणे, बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून सोने चोरणार्‍या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी दोन वेळा पदाफाश केला होता. मात्र कायद्याचा फायदा घेत त्या महिला पुन्हा पुन्हा जामिनावर सुटतात अन् पुन्हा तेच ते काम करतात. गेल्या पाच दिवसापूर्वी अशाच एका महिला टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या मात्र त्यातील दोन्ही महिला ह्या ७ महिन्याच्या गरोदर असल्यामुळे न्यायालयाने त्यांना तत्काळ जामिन दिला अन् पुन्हा त्या महिलांना लुटण्यासाठी मोकळ्या झाल्या. याच महिला गेल्या ८ महन्यापूवी नेकनुर पोलिसांनी पकडल्या होत्या मात्र त्यावेळेस एका महिलेच बाळ १ महिन्याच असल्याने न्यायालयाने तेव्हाही तत्काळ जामिन मंजूर केला होता. त्याच्यात सुधारणा झाली नाही. तेव्हा पासून त्यांनी अनेक महिलांना लाखो रुपयाला गंडा घातला आहे. महिला कायद्याचा फायदा घेवून कुटपर्यंत सुटणार अन् चोर पोलिसांचा हा खेळ किती महिलांचे सोने लंपास केल्यावर थांबणार हे मात्र सांगता येत नाही.


आतापर्यंत या महिलांच्या टोळीने आष्टी, जामखेड, पैठण, जालना, औरंगाबाद, पाथर्डी, माजलगाव, गेवराई, मांजरसुंबा, लातुर, सिरसाळा, तेलगाव सह मराठवाड्यातील विविध बसस्थानकातून अन् चालत्या बसमधून अनेक महिलांचे सोने लंपास केले आहेत. येत्या एक महिन्यात त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील माजलगाव, नेकनुर, धारुर, सह पेठ बीड पोलिसात गुन्हे दाखल आहेत. त्या बसमध्ये बसल्यानंतर एकट्या प्रवाशी महिलेसोबत जवळीक करतात. शिवाय त्या सात महिन्याच्या गरोदर असल्याने इतर महिला त्यांना बसमध्ये स्वत:च्या जवळ बसण्यासाठी जागा देतात अन् त्याचाच त्या फायदा घेवून महिलेचे सोने लुटतात. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणावरुन लुटलेले सोने विकण्यासाठी त्या बीडमध्ये येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरु केला हेाता. दि.२५ जानेवारी २०२१ रोजी सोनी चव्हाण व रोहीणी चव्हाण (दोन्ही रा.नागझरी) यांनी गेल्या १५ ते २० दिवसामध्ये एस.टी.बस प्रवासामध्ये प्रवाशांचे चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी गेवराईहून बीडकडे त्यांचे ताब्यातील पांढर्‍या रंगाचे वेरना कार क्र. एमएच १२ जेयू ४५०० मध्ये बसून येत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, बीड यांचे आदेशाने स.पो.नि.आनंद कांगुणे, स.पो.नि.भास्कर नवले, पोह उबाळे, पोह तांदळे, पोह क्षिरसागर, पोना बांगर, पोना ठोंबरे, पोना गायकवाड, मपोना नरवडे, मपोशि जाधवर, हराळे हे सरकारी जिप क्र.एमएच.२३ एएफ ००५९ व सरकारी जिप क्र.एमएच २३-एफ ०९०२ ने चालक वंजारे यांनी त्या गुन्हेगार महिला टोळीचा शोध घेण्यासाठी निघाले होते. यावेळी गेवराई ते बीड येणारे रोडवर हॉटेल संगमचे समोर रोडवर पोलिसांनी सापळा लावून थांबले असता वरील क्रमांकाची कार येत असल्याची ३.३० वा.चे सुमारास दिसली. सदर गाडीचे चालकाने पोलिसांना रोडवर पाहून गाडी रोडचे बाजूस लावून गाडी सोडून पळ काढला अन् तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी सदर गाडी जवळ जावून पंचा समक्ष गाडीची पाहाणी केली असता गाडीचे पाठीमागील सिटवर दोन महिला बसलेल्या त्यांना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव, पत्ता न सांगता उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचे नाव, पत्ता विचारले असता १) सोनी पप्पु ऊर्फ जावेद चव्हाण (वय २१ वर्षे रा.नागझरी ता.गेवराई), २) रोहीणी शहादेव चव्हाण (वय २४ वर्षे रा.बांगरनाला बालेपीर ता.जि.बीड) असे सांगीतले. त्यावेळी महिला पोलीस अंमलदारांनी पंचा समक्ष अंगझडती घेता महिला नामे १) सोनी पप्पु ऊर्फ जावेद चव्हाण हिचे जवळ एक सोन्याचे काळया मन्याचे गंठण व सोन्याचा पत्ता असलेले २) रोहीणी शहादेव चव्हाण हिचे ताब्यात एक सोन्याचे गंठण व मनीमंगळसुत्र असे मिळून आले. त्याबाबत त्यांना विचारपुस करता महिला आरोपी सोनी पप्पु ऊर्फ जावेद चव्हाण हिने सांगीतले की, तिने व रोहीणी यांनी मागील ८ ते ९ दिवसांपुर्वी नेकनूर बसस्टँडवर एस.टी.बसमधील प्रवाशांचे चोरल्याचे सांगीतले. त्या संदर्भाने पोलिसांनी अभिलेखाची पाहाणी केली असता पोलिस ठाणे नेकनूर येथे दिनांक १७ जानेवारी २०२१ रोजी गुरनं १२/२०२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे दाखल होत . तसेच महिला आरोपी रोहीणी चव्हाण हिचेकडे मिळून आलेले सोन्याचे गंठन व मनी मंगळसुत्र याबाबत विचारपुस करता तिने सांगीतले की, तिने व तिची मैत्रीण संगीता साईनाथ भोसले, चायना उर्फ प्रियंका शहादेव चव्हाण यांनी मिळून ५ ते ६ दिवसांपुर्वी मांजरसुंबा ते बीड प्रवासा दरम्यान बसमध्ये चोरल्याचे सांगीतले व मनीमंगळसुत्र हे अंदाजे १५ दिवसांपुर्वी धारुर बसस्टँड येथे प्रवाशांच्या गर्दीमध्ये चोरल्याचे सांगीतले. वरील चोरीच्या घटना व ठिकाणची पोलिसांनी खात्री केली असता पो.स्टे.पेठ बीड येथे दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी गुरनं ११/२०२१ कलम ३७९ भादंवि व पो.स्टे.धारुर येथे दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी गुरनं ०८/२०२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच महिला आरोपी रोहीणी शहादेव चव्हाण हिस अधिक विचारपुस केली असता तिने अंदाजे १० ते १५ दिवसापुर्वी धारुर ते माजलगांव एस.टी.बसमध्ये प्रवासा दरम्यान व ५ ते ६ दिवसांपुर्वी माजलगांव ते तेलगांव एस.टी.बसमध्ये प्रवासा दरम्यान संगीता साईनाथ भोसले व चायना उर्फ प्रियंका शहादेव चव्हाण यांच्यासह मिळून चोरी केल्याचे कबुल करुन चोरलेले सोन्याचे दागिने गेवराई येथील एका सोनारास विक्री केल्याचे सांगितले. वरील गुन्हयांचा अभिलेख पोलिसांनी पाहिला असता. पो.ठाणे माजलगांव शहर येथे दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी गुरनं १४/२०२१ व दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी गुरनं २३/२०२१ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे. त्यांचेकडे त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या कार बाबत पोलिसांनी विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले की, आम्ही चोरीचे गुन्हे करण्याच्या वेळी ये-जा करण्यासाठी ही गाडी वापरत आहोत. त्यांना पळून गेलेल्या चालका बाबत पोलिसांनी विचारपुस केल्यानंतर त्यांनी सांगीतले की, जावेद उर्फ पपू विश्वास चव्हाण (रा.नागझरी ता.गेवराई) हा सोनी चव्हाण हिचा पती असल्याचे सांगीतले. त्यानंतर पोलिस ठाणे नेकनूर गुरनं १२/२०२१ कलम ३७९ भादंविचे तपासकामी दोन्ही महिला आरोपी त्यांचेकडून पंचनाम्यात नमुद प्रमाणे पो.स्टे.नेकनूर गुरनं १२/२०२१ कलम ३७९ भादंवि, पो.स्टे.पेठ बीड गुरनं ११/२०२१ कलम ३७९ भादंवि, पो.स्टे. धारुर गुरनं ०८/२०२१ कलम ३७९ भादंवि मधील जप्त मुद्येमाल व तसेच गुन्हा करण्यासाठी जाणे येणेसाठी वापरलेली वेरना पो.स्टे.ला हजर केले. मात्र त्या दोन्ही आरोपी महिला ह्या ७ महिन्याच्या गरोदर असल्याने नेकनुर पोलिसांनी त्यांना अधिक विचारपूस न करता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना गरोदर असल्यामुळे तत्काळ जामिन मंजूर केली. सात महिन्यापूर्वी देखील रोहिनीने नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी केली होती. तेव्हा तीची प्रसुती झालेली होती तिचे बाळ १ महिन्याचे असल्यामुळे न्यायालयाने तीला जामिन दिला होता. गरोदर अन् लहान मुलांचा फायदा घेवून तिने चोरीचे काम सुरुच ठेवले. गेवराई पोलिस ठाण्यात देखील या महिलेवर ३०२ चा गुन्हा दाखल होता. ती जेलमध्ये राहून देखील आलेली आहे.
बसमध्ये सोने चोरणार्‍या टोळीतील महिला ह्या वाहकाच्या तत्काळ लक्षात येतात. अशा वेळी वाहकांनी प्रवाशांना सावध करणे गरजेचे आहे. अनेक वाहक प्रवाशी महिलांना सावध करतात मात्र तरी देखील त्या महिलांचे सोने लंपास करतात. सोने चोरणार्‍या महिला बसमध्ये बसल्यास अन् एकाद्या महिलेचे सोने चोरले तर वाहकांनी बस थेट पोलिस ठाण्यात लावणे गरजचे आहे. मात्र तसे होत नाही. अन् त्या महिला तेथून पोबारा करतात. सोने चोरणार्‍या महिला ह्या बसस्थानकातच एकटी महिला,किंवा ज्या महिलेसाबत बाळ आहे अशा महिला हेरतात. अन् ति ज्या गावाला जाणार आहे. त्याच गावाचे या टोळीतील महिला तिकिट घेतात. बसच्या पाटीमागेच टोळीतील एक चार चाकी गाडी असते. त्यांनी सोन चोरल की त्या येणार्‍या बसस्थानकात उतरुन स्वतच्या चारचाकी गाडीतून पोबारा करतात. सोन लंपास झाल्याचे अनेक वेळा महिलांच्या उशिरा लक्षात येते. सोने चोरणार्‍या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफास केला असला तरी त्या कायद्याचा फायदा घेवून पुन्हा चोरी करण्यास सक्रिय होत आहेत. त्यामुळे महिलांनी बसमध्ये प्रवास करतांना आपली बॅग, पिशवी स्वत:च्या जवळ ठेवावी अनओळखी महिलेच्या जवळ पशवी देवू नये, प्रवासात बापले बाळ कोण्या अनओळखी महिलेकडे देवू नये. सोने चोरणार्‍या महिलांकडे एक बाळ असते. ते बाळाला बसण्यासाठी आपल्या सिटवर जागा मागतात अन् त्याचा फायदा घेवून त्या सोने चोरतात. शिवाय गरोदर असल्याचा फायदा घेवून देखील त्या प्रवाशी महिल्याचे सिटवर बसतात अन् त्याच महिलेला काम दाखवतात. त्यामुळे घराबाहेर पडल्यावर साधव रहा…सतर्क रहा… अशा लुटारूंच्या महिला टोळींपासून आपण स्वत: आणि आपल्या नातेवाईकांना दुर राहण्याचा सल्ला द्या असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version