Saturday, November 27, 2021
No menu items!
HomeUncategorizedइंधन दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईमध्ये कॉंग्रेसने बैलापुढे वाजवली पिपाणी

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईमध्ये कॉंग्रेसने बैलापुढे वाजवली पिपाणी

बैल के आगे बिन बजाना आंदोलन चर्चेत
गेवराई (रिपोर्टर) पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात मा.खा.रजनीताई पाटील यांच्या आदेशावरून बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ड.श्रीनिवास बेदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंप समोर गेवराई येथे अनोखे प्रतीकात्मक बैल के आगे बिन बजाना आंदोलन बैला समोर पुंगी वाजवून जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसलेल्या मुक़्या, बहिर्‍या, आंधळ्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.


यावेळी बोलताना बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ड.श्रीनिवास बेदरे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल,डिझेल, गँस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढच होत असुन यांचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाहनचालकांना, मालवाहतुकदारांना यांचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणार्‍या दरवाीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडर च्या दरवाढी विरोधात देशभरात रोजच आंदोलने चालू आहेत तरीही मुक़्या, बहिर्‍या, आंधळ्या मोदी सरकारवर काहीच फरक पड़त नाही. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी गेवराई येथे प्रतिकात्मक बैल के आगे बिन बजाना आंदोलन करण्यात आले यामध्ये जसे की बैलासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही,त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पड़त नाही असेच दिसत आहे. म्हणून आज हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले व इंधन दरवाढ ताबड़तोब मागे घ्यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.


यावेळी कडूदास कांबळे गेवराई विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष किरण अजबकर,बळीराम गिराम,शेख अलिम,बाळासाहेब आतकरे,विशाल जंगले,राजू पोपळघट,संभाजी अजबकर , निलेश माळवे बालाजी बांडे, प्रवण भरती, आल्टफ शेख, कारण बोरुडे, पाटील राजू, मनुसार भाई, गोटू सावंत,रवी नाईक,शेख शकील,माउली,सोनू भरती, महादेव रोकडे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!