Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeदेश विदेश१५ ऑगस्ट १९४७ ला आरएसएसने काळा दिवस साजरा केला होता त्याचं काय?-प्रकाश...

१५ ऑगस्ट १९४७ ला आरएसएसने काळा दिवस साजरा केला होता त्याचं काय?-प्रकाश आंबेडकरांचा सवाल


मुंबई (रिपोर्टर)- प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला होता. काही आंदोलकांनी लाल किल्ल्‌यावर धार्मिक ध्वज फडकावला होता. या घटनेवरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणातून नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं होतं. त्यावरून आता महाराष्ट्रातील नेत्याने राष्ट्रपतींना सवाल केला आहे. ज्या आरएसएसने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं, असं म्हणत राष्ट्रपतींना प्रश्न विचारला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून राष्ट्रपतींना इतिहासाचा दाखल देत आरएसएसने सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणं आवश्यक आहे की, ज्या आरएसएसने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवू.
आरएसएसने तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकर्‍यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकर्‍यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ साली काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!