Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडबांधकाम कामगारांना पेन्शन लागू करा आरसीसी बांधकाम संघटनेने केली मागणी

बांधकाम कामगारांना पेन्शन लागू करा आरसीसी बांधकाम संघटनेने केली मागणी


बीड (रिपोर्टर)- बांधकाम करणार्‍या कामगारांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन लागू करण्यात यावी, अशी मागणी आरसीसी बांधकाम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन संघटनेने महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिली आहे.
बांधकाम करणार्‍या मजुरांना शासनाच्या वतीने सुविधा द्याव्यात, अशी सातत्याने मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. ६० वर्षे वयानंतर कामगारांना पेन्शन लागू करण्यात यावी, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी शासनाने मदत करावी, विधूर पती व विधवा पत्नी ही योजना शासनाकडून २४ हजार रुपये वार्षिक प्रमाणे पाच वर्षे या दोघांपैकी एकाला मिळत आहे तर हे लाभ कायदेशीर वारसाला देण्यात यावे, नुतनीकरण करणार्‍या कामगारांना स्मार्ट कार्ड देण्यात यावे, नोंदणीकृत कामगारांची नोंदणी व नुतनीकरण पावती स्मार्ट कार्ड कॅम्प घेऊन देण्यात यावे यासह इतर मागण्या संगटनेच्या वतीने कामगार कल्याणकारी मंडाकडे करण्यात आल्या आहेत. याबाबत मंडळाने योग्य तो निर्णय घेऊन कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असे संघटनेच्या वतीने म्हटले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!