Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडभाजपचे अच्छे दिन लंगोटवर भारी

भाजपचे अच्छे दिन लंगोटवर भारी


महागाईचा आगडोम उसळला,सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातला अर्थसंकल्प रोज ढासळतोय
हायऽऽ रे हायऽऽ ही महागाई!
बीड (रिपोर्टर):- पेट्रोल आणि डिझेलच्या भावाने शंभरीकडे वाटचाल केली असतांनाच सर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरात सातत्याने लागणार्‍या जीवनावश्यक वस्तुंनी महागाईचा मोर्चा उघडल्याने सर्व सामान्य माणसांना घर चालवणे मुश्किल होवून बसले असून दाळी, दुळीसह मिरची मसाला, तेल, गुळ यांच्या महागाईची उंची एवढी वाढली की भाजपाचे अच्छे दिन सर्व सामान्यांच्या लंगोटवर भारी पडत असून पाम तेल ते शेंगदाना तेल ११५ ते १५० रूपये प्रति लिटरने घ्यावे लागत आहे. शेंगादाना ११०, तुर दाळ ११०, उडीद ११०, बेसन ६०, मिरची २५०, तांदळाचे भावही प्रति किलो दहा रूपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. देशवासियांनी तत्कालीन सरकारच्या विरोधात मतदान करत आपल्या घरात अच्छे दिन येतील म्हणून भाजपाच्या सरकारला देशाच्या सत्तेत बसवले. मात्र दोन पंचवार्षिक निवडणूकीत बहुमते घेवून भाजपाच्या सरकारने देशभरातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळ्यांसह सर्वसामान्य माणसांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याऐवजी धनदांडग्या उद्योगपतींना फायदा कसा होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिल्यामुळे भाजपाच्या साडेसहा वर्षाच्या कालखंडात महागाईने प्रचंड डोकेवर काढले. सर्व सामान्यांच्या स्वयंपाक गृहात लागणार्‍या वस्तू शंभरीपार करत गेल्या तर पेट्रोल-डिझेल आणि गॅस यांनी अक्षरश: सर्वसामान्यांना रडवून सोडले आहे. आज मित्तीला पेट्रोलचे भाव ९३.९० तर डिझेलचे भाव ८३.०५ एवढे झाले असून त्यामुळे ट्रान्सपोर्ट क्विंटलामागे पंधरा ते वीस रूपयाने वाढला आहे. त्याचा फटकाही सर्वसामान्यांना बसतांना दिसून येत आहे. कोरोनाच्या कालखंडात वर्षभर आर्थिक उत्पन्न नसलेल्या कुटुंबियांना आज मात्र महागाईमुळे अक्षरश: सळो की पळो करून सोडले असून भाज्यांमध्ये महागाईचे तेल, मीठ घालायचे कसे? हा प्रश्‍न सर्व सामान्यांसमोर आव आसून उभा आहे. ज्याच्या घराचे उत्पन्न पाच हजारापेक्षा ही कमी आहे अशांना तर घर चालवणे मुश्किल होवून बसले असून मध्यमवर्गीय कुटुंबाचा वार्षिक सोडा रोजचा अर्थसंकल्प रोजच ढासळून जात असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून सोमवारी देशाचा अर्थसंकल्प भाजप सरकारचे अर्थमंत्री सादर करणार आहेत. मात्र महागाईमुळे रोज घराघरातले अर्थसंकल्प पुर्णत: नेस्तनाबुद होत असल्याने महगााईला रोखण्यासाठी सरकार पाऊल उचलणार का? की सर्वसामान्याचा त्याच्या अंगावर राहिलेला लंगोटही भविष्यात काढुन घेणार? असा संतप्त सवाल सर्वसामान्यातून विचारण्यात येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!