Friday, March 5, 2021
No menu items!
Home बीड खांदे बदलाचा राजकीय तमाशा

खांदे बदलाचा राजकीय तमाशा

शेख मजीद । बीड
राजकारण हा एक मोठा विनोद आणि अविश्‍वासाचा भाग झाला. कोणी कोणावर विश्‍वास ठेवावा याला काही मर्यादा राहिल्या नाहीत. सरपंचापासून ते बड्या नेत्या पर्यंत सगळेच आपल्या सोयीनूसार राजकीय भुमिका घेतात आणि आपला स्वार्थ साधतात. राजकीय पुढारी इतके स्वार्थी झाले की, त्यांना जनतेचं काही देणं-घेणं राहिलेलं नाही. नाव जनतेचं दाखवायचं काम मात्र ‘लबाड’ करायचं असंच सगळीकडे होवू लागलं. निवडणुका जवळ आल्यानंतर तर खांदे बदलाचा तमाशा दिसून येतो. या तमाशाला सुरुवात झाली. हा तमाशा पाहून सर्वसामान्य माणुस थक्क होत आहे.

राजकारण हा सत्तेत जाण्याचा मार्ग आहे. राजकारण हे गजकर्णासारखं झालं. आजच्या राजकारणाबाबत किती बोलावं आणि काय बोलावं याला काही मर्यादा राहिल्या नाहीत. सरपंच पदापासून ते खासदारापयर्र्ंत सगळेच आप-आपल्या सोयीचं राजकारण करुन स्वत:च्या पोळ्या भाजून घेतात. स्वार्थी राजकारणाच्या जमान्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मरण येतं. स्वार्थीपणामुळे निष्ठावंताची संख्या कमी झाली. जो तो फायद्याचं राजकारण पाहू लागला. राजकारणात मोठं होण्यासाठी कार्यकर्ते ‘गॉडफॉदरचा’ शोध घेत असतात. राजकारणातून समाजकारणाची वजाबाकी होवू लागली. आधी माझ्या ताटात वाढा नंतर लोकांचं बघू अशी भावना राजकारणात निर्माण झाली. निवडणुकीत लावलेले पैसे काढले पाहिजे असा विचार जो-तो करत असतो. पैसे निघाले नाही की, बंडखोरी केली जाते, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या जातात. इकडून-तिकडे पळणे म्हणजे फुकट पळत नाही, त्यात काही ना काही स्वार्थ दडलेला असतो. फायदा व्हावा म्हणुनच राजकारणी पक्ष बदलतात. समाजसेवा किंवा लोकांच्या प्रश्‍नांची सोडवणुक व्हावी म्हणुन कुणीच इकडून-तिकडे उड्या मारत नाहीत. न.प.च्या स्थानिक निवडणुका काही महिन्यावर येवून ठेपले आहेत. या निवडणुकीत आपली बाजु सरस राहण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करु लागले. कोणता नेता आपल्या फायद्याचा राहिल याचा विचार करु लागले. ज्या प्रमाणे महामारी येते त्या प्रमाणे खांदेपालट होवू लागलं. खांदे पालट करणं ही काही चांगल्या राजकारणाची नांदी नाही.

नव्या कार्यकर्त्यांचा जोर वाढला
प्रत्येक पाच वर्षाच्या कार्यकाळात राजकारणात बदल होत असतात. बहुतांश तरुण कार्यकर्ते पुढे येत असतात. तरुण कार्यकर्त्यांचा आपल्या राजकारणासाठी कसा फायदा करुन घ्यायचा याचा विचार प्रस्थापीत पुढारी करत असतात. येणार्‍या निवडणुकीत अनेक जण नगरसेवक पदासाठी बाशींग बांधून बसले आहेत. नव्या कार्यकर्त्यांना आपल्याशी कसे जोडता येईल याचा जोरदार प्रयत्न होवू लागला. निवडणुकीत सगळेच पक्ष आपलं नशीब अजमावत असतात. ज्याची ताकद मोठी आहे. तोच पक्ष राजकारणाचे सिंहासन ताब्यात घेत आलेला आहे. निवडणुकीला आणखी बराच वेळ आहे. मात्र आता पासून बीडच्या राजकारणात गरमा-गरमी सुरु झाली आहे.

निवडणुका येताच जनतेची आठवण येते
बीडची नगर पालिका ही मोठी आहे. या न.प.च्या निवडणुकीत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावत असतात. गेल्या तीस वर्षापासून न.प.वर क्षीरसागरांचे वर्चस्व आहे. क्षीरसागरांनी आता पर्यंत आपले वर्चस्व ढळू दिले नाही. भले ही निवडणुकीत कुणी किती ही उड्या मारल्या तरी निवडणुकीत जे व्हायंचं तेच होतं. भले-भले निवडणुकीत आपली तलवार म्यान करुन बसतात. निवडणुकीत भाव वाढवून घेण्यासाठी आरडा ओरड करणारांची संख्या मोठी आहे. जेव्हा लढाईची वेळ येते, तेव्हा ओरडणार्‍यांच्या गोटात शांतता असते. कार्यकर्ते लोकांच्या प्रश्‍नांच्या बाबतीत लढत असल्याचे सांगत असतात. प्रत्यक्षात लोकांच्या प्रश्‍नाबाबत कार्यकर्त्यांना किती अस्था आहे हे पाच वर्षात दिसून आलेलं आहे.

अनेकांनी विश्‍वास गमावला!
गतवेळी न.प. निवडणुकीच्यावेळी बीड शहरातील काहींनी वेगवेगळे प्रयोग करुन पाहितले. एक दबाब गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. गत निवडणुक ही अटीतटीची गाजली होती. अध्यक्ष हा जनतेतून निवडला होता. त्यामुळे नगरसेवकाला इतका भाव नव्हता. मात्र उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडीवेळी बीडमध्ये नगरसेवकांना चांगला भाव आला होता. यात काकू-नाना आघाडी आणि नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर यांच्यात रस्सीखेच निर्माण झाली होती. त्यात प्रमुख भुमिका एमआयएमच्या नगरसेवकांनी निभावली. एमआयएमचे काही नगरसेवक फुटले आणि त्यांनी आघाडीला पाठिबा दिला. त्यानंतर याच नगरसेवकांनी विकासाचं नाटक दाखवत पुन्हा पलटी मारली. हे नगसेवक नगराध्यक्षांच्या गटात गेले. आता निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएमसह आघाडीच्या काहींनी नगराध्यक्षांचा आसरा घेतला आहे. निवडणुकीच्या तोंडावर इकडून तिकडे पळणार्‍या नगरसेवकांनी वार्डातील जनतेचा विश्‍वासच गमावला असल्याचे दिसून येवू लागले.

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरात आज आठवडी बाजारात कोरोनाचे गांभीर्य नसणार्‍या दुकानदारांवर तहसीलदार सचीन खाडे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून बाजारात झालेली...

अंबेवडगाव जवळ कार-ट्रॅक्टरचा अपघात एक ठार

किल्ले धारूर (रिपोर्टर ) -धारुर तालुक्यातील अंबेवडगाव येथे पहाटे तिन चे दरम्यान कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या...

दोघांचा मृत्यू, नवे ५७ रुग्ण

बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्युचा दरही कमी व्हायला तयार नाही. काल जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा...