Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमराक्षसभुवन जवळ गोदापात्रात विद्यार्थी बुडाला

राक्षसभुवन जवळ गोदापात्रात विद्यार्थी बुडाला


    गेवराई (रिपोर्टर)- पोहण्यासाठी गेलेल्या एक १७ वर्षीय विद्यार्थी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राक्षसभुवन (शनि) येथील गोदावरी नदीच्या पात्रात बुडाला. याची माहिती गावकर्‍यांसह प्रशासनाला झाल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. दुपारी दीड वाजता त्याचा मृतदेह गाळात फसलेल्या अवस्थेत आढळून आला.  तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी आणि चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते. गावकरीही बोटद्वारे त्याचा शोध घेत होते.

अविनाश जगदीश नाटकर (वय १७, रा. राक्षसभुवन) हा विद्यार्थी सकाळी ९ वाजता गोदावरी नदीच्या पात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो बुडाला. याची माहिती गावकर्‍यांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. शोधासाठी बोट आणि चप्पुचा वापर करण्यात आला. दुपारी दीड वाजता गाळामध्ये फसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.  तहसीलदार सचिन खाडे, मंडल अधिकारी, तलाठी वाकोडे, चकलांबा पोलिस ठाण्याचे पीआय झिंजुर्डे यांच्यासह कर्मचारी त्याठिकाणी तळ ठोकून होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!