- 1986 पासुन भुसंपादनाचे 1242 प्रकरणे प्रलंबीत
– लवकरच निकाली निघणार
माजलगाव, दिनकर शिंदे :
एम.आर.जी.एस. हे सेक्शन ग्रामीण विकासाचे केंद्र आहे. माजलगाव मतदारसंघात जवळपास 568 कोटी रूपयांचे बजेट मंजुर असुन त्याच्या प्रत्यक्ष कामाची सुरूवात एप्रिल महिण्यात होणार आहे. या माध्यमातुन गावा – गावांचा चेहरा – मोहरा बदलणार असुन विकासाची गंगा या कामामुळे मतदारसंघात वाहणार आहे तर 1986 पासुन भुसंपादनाचे अनेक प्रकरणे प्रलंबीत असुन त्याचा शासन स्तरावरून निपटारा होण्यासाठी शासन कटीबध्द झाले असुन येत्या काही दिवसांत हे प्रकरणे नव्या नियमानुसार निकाली काढण्यात येणार असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगीतले.
आमदार सोळंके यांच्या निवासस्थांनी सकाळी दहा वाजता आयोजित पत्रकार परिषदेत सोळंके बोलत होते. बोलतांना म्हणाले की, माजलगाव मतदारसंघात जवळजवळ 600 कोटी रूपयांची एमआरजीएसची कामे मंजुर आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ही कामे होउ शकलेली नाहीत. मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असतांना झालेल्या आढावा बैठकीत प्रलंबीत कामे कसे लवकरात लवकर मार्गी लागतील या सुचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. आढावा बैठकीमध्ये अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे कामाबाबत गंभिर नसुन ते वारंवार बैठकीस गैरहजर राहतात. ही बाब गंभिर असुन याविषयी गैरहजर राहणा-या कर्मचा-यांच्या विरोधात संसदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मी स्वतः मांडणार आहे. एम.आर.जी.एस.मध्ये माजलगाव तालुक्यात 45 हजार कामे असुन त्याचे बजेट 385 कोटी रूपये आहे. धारूर मध्येे 96 कोटी 41 लाख रूपयांची 1559 कामे आहेत तर वडवणी मध्ये 80 कामे आहेत. भुसंपादनाचे अनेक प्रकरणे मतदारसंघात प्रलंबीत आहेत. 1986 पासुन या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असुन एकुण 1242 प्रकरण मार्गी लावण्याच्या दृष्टीकोणातुन आगामी काही दिवसांत प्रयत्न करण्यात येउन ही कामे मार्गी लागतील. नविन 2013 च्या कायद्यानुसार 150 प्रकरणे मार्गी लावण्यात येतील असेही त्यांनी सांगीतले. ही काम मार्गी लावण्यासाठी 105 कोटी रूपयांची गरज असुन एरिगेशन आणि रोजगार हमी अशी दोन गटांची कामे विभागण्यात आली आहेत. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना गतिने राबविण्यात येणार आहे. या योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासुन मतदारसंघात सुरू आहे. तसेच शेतक-यांचा अत्यंत महत्वाचा असणारा शेतरस्त्याचे प्ररकण हे तहसिल पातळीवरून लवकरात लवकर मिटविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या असल्याचे सांगीतले. या पत्रकार परिषदेला मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे यांची उपस्थिती होती.