नगर (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप झाल्यानंतर अखंड महाराष्ट्रातून सर्वस्तरातून त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण समोर आल्याचे गेल्या पंधरवाड्यात उभ्या महाराष्ट्राने पाहिले. नगर जिल्ह्यात संत वामनभाऊ व संत भगवान बाबा यांच्या दर्शनासाठी धनंजय मुंडे गेले होते तेंव्हा त्या ठिकाणी ह.भ.प.इंदोरीकर महाराजांचं कीर्तन सुरू होतं. त्यावेळी धनंजय मुंडे कीर्तनाला बसले असता ह.भ.प.इंदोरीकर महाराजांनी संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांचा धनंजय मुंडेंना आशिर्वाद प्राप्त आहे. संतांचे आशिर्वाद प्राप्त झाल्याने माणुस मोठा होतो याचे मुर्तीमंत उदाहरण धनुभाऊ आहेत असे म्हटले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप झाल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक उभे ठाकले. धनंजय मुंडेंनी संघर्ष करत राज्यात आपली जागा निर्माण केली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात धनंजय मुंडे यांचे दणक्यात स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होेत. काल नगर जिल्ह्यातही नेवासा, वंजारवाडी धनंजय मुंडेंचे मोठे स्वागत झाले. संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या दर्शनासाठी ते मंदिरात गेले त्यावेळेस ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तन सुरू असल्याचं पाहून धनंजय मुंडेंनी कीर्तन ऐकण्याचे ठरवले आणि ते त्या ठिकाणी बसले. यावेळी ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांनी धनंजय मुंडेंबाबत उद्गार काढतांना म्हटलं, संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांचा धनंजय मुंडेंना आशिर्वाद प्राप्त आहेत. संतांचे आशिर्वाद प्राप्त झाल्याने माणुस मोठा होतो याचं मुर्तीमंत उदाहरण धनुभाऊ आहेत असे ही इंदोरीकर यावेळी म्हणाले.