Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडतब्बल बारा वर्षांनी लागला उस्मानपुर्‍याचा शोध!

तब्बल बारा वर्षांनी लागला उस्मानपुर्‍याचा शोध!


नगर पालिका हद्दवाढ होवून दहा वर्षे झाली तरी अनेक भाग दुर्लक्षित, नगर पालिकेच्या योजनेपासून वंचित नागरिक सहन करतायत मरण यातना; काही लोकांना हे पण माहित नाही की ते नागरिक आहेत की ग्रामस्थ?
बीड शहरातील तेलगाव रोडवर असलेल्या डोंगरात झाकलेले उस्मानपुर्‍याच्या नागरिकांना होतो लिकेज वॉलवरून पाणी पुरवठा, दररोड डोंगर चढून करतात चिखलातून ये-जा; लाईट व्होलटेज टिमटिमत्या दिव्यात करतात गुजरान
बीड शहर हद्दवाढीची रचनाच विचित्र, गयानगर या भागाचा अर्धा भाग शहरात तर अर्धा भाग ग्रामीणमध्ये; नागरिक संभ्रमात, निवडणूकी दरम्यान ग्रामीण आणि शहरात मतदान यादीत डबल नावे आली असल्याच्या तक्रारी
उस्मानपुरा परिसरातील नागरिकांचा फक्त निवडणूकी पुरताच विचार केला जातो, इतर आमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही; ऍटो रिक्षाला पैसे दिले तरी तो येत नाही, पावसाळ्यात तर भयान अवस्था, आठ दिवसापूर्वी एक वृद्ध रस्त्याने घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची मिळाली माहिती
शहराच्या चोहीलगत असलेले तरफ बोबडे, खोड, माळी, पिंगळे, बलगुजार,गिराम, देशमुख या गावातील अनेक सर्व्हे नंबरचा हद्दवाढीच्या अ आणि ब यादीत समावेश तरी यातील अनेक सर्व्हे नंबर विकासापासून कोसोदूर
शहरातील हद्दवाढ झालेल्या काही भागात आजही टँकरने पाणी पुरवठो, गांधीनगर भागात पहायला मिळाले चित्र; विशेष म्हणजे गोरगरीब मोहल्लेच दुर्लक्षित; आठ-दहा दिवसाला पाणी टँकर येत असल्याने रस्त्यावर ड्रम ठेवून पाणी साचून ठेवण्याची वेळ
नगर परिषद मुख्याधिकारी गुट्टे यांच्या प्रयत्नाने हद्दवाढ झालेल्या काही भाागत रस्ते, पाईपलाईन योजना पोहचली परंतू डोंगरात झाकलेल्या उस्मानपुरा या योजनेपासून वंचितच
हद्दवाढीचा मुद्दा सर्व प्रथम १९७३ साली स्व.अथर बाबर यांनी समोर करून प्रस्ताव तयार केले होते परंतू नंतर १९९६ पर्यंत हे प्रस्ताव धुळखात पडूनच होते; २००१ साली नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला, शहरातील तेलगाव नाका काही परिसर, गांधी नगरचा मोठा भाग, रोशनपुर्‍याचा काही भाग, भक्तीनगरच्या पाठीमागची बाजू, हिनानगर, ठाकूरनगर, अंकुश नगरचा मागील भाग, सय्यद अली नगरचा मोठा भाग या भागात नगर पालिकेच्या सुविधेचा प्रचंड अभाव
बीड नगर पालिकेने २००१ साली सर्व्हेक्षण करून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार केला होता, तब्बल १० वर्षाने म्हणजे २०११ साली प्रस्ताव पास झाला म्हणूनच दरम्यान शहराची हद्द जास्तीने व झपाट्याने वाढलीे; याची नोंद घेतली नसल्याने हद्दवाढीत गोंधळ झाल्याची चर्चा
तत्कालीन बीड नगर परिषदेचे अध्यक्ष स्व.अथर बाबर यांनी १९७३ साली बीड हद्द वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतू त्यावेळी जागा आरक्षित असल्याने कोणीही त्या प्रस्तावाला महत्त्व दिले नाही म्हणून तो प्रस्ताव १९९६ पर्यंत तसाच पडून होता. १९९६ साली तत्कालीन नगराध्यक्ष यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव पुन्हा तयार करण्याच्या सूचना दिल्या. हद्दवाढ ही शहराच्या विकासासाठी मोठी गरज आहे. १९७३ च्या प्रस्तावाला त्याच वेळेस मान्यता मिळाली असती तर आज शहराचा मोठा विकास झालेला दिसून आला असता. परंतू त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून १९९६ ला नवीन प्रस्ताव तयार करण्याचा फक्त विचारच झाला असावा. म्हणूनच २००० सालापर्यंत बीड नगर हद्दवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव दाखल झालेला नव्हता. म्हणून २००१ साली खर्‍या अर्थाने प्रस्ताव तयार करून हद्दवाढीची मागणी करण्यात आली आणि त्या प्रस्तावाला तब्बल १० वर्षानंतर म्हणजे २०११ साली हद्दवाढीची मान्यता अ आणि ब या दर्जानुसार देण्यात आली. हद्दवाढ झाली असली तरी बीडचा विकास जुन्या शहरातच खोळंबलेला दिसून येतो. ज्या अर्थी जुन्या शहरातच जागोजागी खड्डे, पाण्याची टंचाई तसेच तुंबलेल्या नाल्या ही समस्याच संपलेली नसतांना नवीन सर्व्हे नंबर हद्दवाढीत आल्याने आणि निधीची कमतरता असल्याने नवीन हद्दवाढ झालेले सर्व्हे नंबर पैकी अनेक सर्व्हे नंबर विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे. यात विशेेष म्हणजे शहरातील असे नवीन भाग जे हद्दवाढीत शहरात आलेले आहे असे अनेक भाग पुर्णत: दुर्लक्षित असून नगर पालिकेची कोणतीही योजना या भागात पोहचलेली दिसून येत नाही. सध्या कार्यरत असलेले नगर पालिका मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी काही प्रमाणात प्रयत्न करून हद्दवाढ झालेल्या काही भागात रस्ते, नाली, पाणी हे प्रश्‍न मार्गी लावले असले तरी असे अनेक भाग आहेत की ज्याची नगर पालिकेत नोंद आहे की नाही? याचाही संशय वाटतो. याचे ताजे उदाहरण पहायला मिळाले ते बीड शहरातील तेलगाव नाका परिसरात. तेलगाव नाक्याकडे जातांना उजव्या बाजूला डोंगरात झाकलेल्या उस्मानपुरा हे भाग अत्यंत दुर्मिळ ठिकाणी असल्याने दुर्लक्षित झाले असावे. अत्यंत भयावह अवस्थेत त्या परिसरातील नागरिक जीवन जगत आहेत. याचा शोध तब्बल १२ वर्षांनी लागला असून बीड शहरात उस्मानपुरा नावाचा एखादा मोहल्ला आहे याचीही माहिती नागरिकांनाच काय? प्रशासनाला नसावी. ही अत्यंत गंभीर बाब असून त्या परिसरातील नागरिक शेख जमीर यांनी अशी माहिती दिली की, निवडणूकी दरम्यान सुद्धा नेते आमच्या उस्मानपुर्‍यात येत नाहीत. फक्त नेत्यांची माणसं येतात व आम्हाला मतदान करायला लावतात. नंतर आमच्या अडचणी जाणून घ्यायला कोणीही येत नाही. ऍटो रिक्षावाला पैसे दिले तरी रस्त्यावरच सोडतो. वृद्धांना, गर्भवती मातांना उचलून दवाखान्यात घेवून जाण्याची वेळ आमच्यावर येते. पावसाळ्यात तर भयभीत जीवन जगावे लागते. एवढेच नव्हे तर पाण्याचा नळ, गटार व रस्ते या उस्मानपुर्‍यातील लोकांनी आजपर्यंत पाहिलेच नाहीत. कसे तरी करून लाईट आणली, त्या लाईटला व्होल्टेज नसल्याने टिमटिमत्या दिव्यात रात्र काढायची वेळ आमच्या आलेली आहे. एवढेच नव्हे तर उस्मानपुर्‍याच्या दोेन बाजुने झाडाझुडपे असल्याने उस्मानपुर्‍यात साप, विंचुचा दिवसाही संचार होतो. अत्यंत हालाकीत हे लोक जीवन जगत आहेत. नगर पालिकेने हद्दवाढ झालेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची गरज असून नवीन भागाचा विकास करणे गरजेचे झाले आहे.
बीडपासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेलगाव नाका चढावरून जात असतांना उजव्या बाजूने मोठे पाण्याचे वॉल लिकेज असल्याचे दिसून येते. त्या पाण्याच्या लिकेजमधून शेकडो परिवार आपल्या परिवाराची तहान भागवितात. हमखास त्या वॉलच्या चोहीबाजूने प्लास्टिकची पाईपलाईन दिसून येते. ही पाईपलाईन थेट उस्मानपुर्‍यात जाते. या लिकेजमधून उस्मानपुरा नागरिकांना पाणी पुरवठा होतो. उस्मानपुर्‍यात रस्ता, पाणी आणि गटारी याची अत्यंत गरज असून पावसाळ्यात तर उस्मानपुर्‍याच्या चोही बाजूने पाणी आत शिरते. अत्यंत भयंकर अवस्थेत त्यांना दिवस काढण्याची वेळ आलेली आहे. तसे पाहिले तर तेलगाव नाका रोडवरून जातांना टेकाडाच्या पलीकडे एखादा मोहल्ला असेल असे अजिबात वाटत नाही. परंतू ते टेकाड पार करून वर गेल्यानंतर तब्बल दिडशे ते दोनशे घर असलेली किमान १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला उस्मानपुरा पुर्णत: हद्दवाढ झाल्यानंतर तब्बल १२ वर्षापासून दुर्लक्षितच आहे. हद्दवाढ झाल्यानंतर बीड शहराच्या चोहीबाजूने असलेले तरफ बोबडे, खोड, माळी, पिंगळे, बलगुजार, गिराम, देशमुख तरफ येथील अनेक सर्व्हे नंबरचा समावेश शहरात करण्यात आला. ही हद्दवाढ फक्त कागदोपत्री झाले की काय? अशी चर्चा वंचित नागरिक करत असून नगर पालिकेची ही हद्दवाढ झालेली विचित्र असल्याचे बोलले जात आहे. ज्याअर्थी २००१ साली सर्व्हेक्षण करून हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला तो प्रस्ताव २०११ साली अंमलबजावणीसाठी नगर पालिकेला सोपवण्यात आला. दरम्यान १० वर्षे बीड शहराची हद्द आणखी पुढे गेली. २००१ च्या हद्दवाढी सर्व्हेक्षणानुसार तो प्रस्ताव बरोबर असला तरी १० वर्षाचा गॅप झाल्याने शहराच्या हद्दवाढी संदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या असाव्यात. दुुसरीकडे शहरासाठी मुबलक निधी नसल्याने शहराचाच विकास खुंटलेला आहे तर मग नवीन भाग कसा डेव्हलप करायचा अशा अनेक समस्या नगर पालिकेसमोर असली तरी राजकीय व प्रशासकीय समन्वयातूनच बीडचा विकास शक्य होणार यात काही शंका नाही.

हद्दवाढीत या सर्व्हे नंबरचा समावेश
हद्दवाढीला २०११ ला मान्यता मिळाल्यानंतर अ आणि ब अशा प्रकारे हद्दवाढीच्या याद्या तयार करण्यात आल्या. त्यात अ यादीत तरफ बोबडे सर्व्हे नं.७, ८, ५४ ते ५७, ११३ ते १२२, १४८, १४९, १५१ ते १५५, १८६ ते १८८, २०८, २०९ तरफ खोड सर्व्हे नं.२४, २७ ते ३४, ९२, ९३, १९३, १९४, तरफ माळी सर्व्हे नं.२ (भाग) आणि ३, तरफ पिंगळे सर्व्हे नं. १ (भाग), ४ ते ७, ९ ते १८, २१, ९८, ९९, १०२ ते १०७, १०९, ११४ ते ११६, १३४, १५७ ते १६४, १६६ ते १७२, १७६ ते १८५, १८७ ते २०९, २१०, २१२ आणि २१३, तरफ बलगुजार सर्व्हे नं. ३ ते ५, ९ ते १६, १७ (भाग), १८ (भाग), २३ (भाग), २९, ३०, ४३ ते ४५, ४७ ते ९१, ९४ ते १५२, १५४ ते १५७, २१५, २१७ ते २२१, १५७ व १८८ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, सर्व्हे नं. १८८ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत आणि सर्व्हे नं.१८८ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, पश्‍चिम बाजु तरफ पिंगळे सर्व्हे नं.१८८ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत, नंतर सर्व्हे नं.१८८ च्या पश्‍चिम-उत्तर हद्दीपर्यंत, नंतर सर्व्हे नं.१८८ व १८९ च्या दक्षिण हद्दीपर्यंत नंतर स.नं.१८९ च्या दक्षिण-पश्‍चिम हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१९२ (भाग) व १९३ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१९३ व १९४ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१९४ च्या उत्तर हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१९५ (भाग) १९६, १९९ आणि १९८ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत, तरफ गिराम स.नं.४२ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत, नंतर स.न.४२ (भाग) च्या उत्तर हद्दीपर्यंत, नंतर स.नं.४३ च्या पश्‍चिम उत्तर हद्दीपर्यंत, नंतर स.नं.४३ च्या पश्‍चिम-उत्तर हद्दीपर्यंत, नंतर स.नं.४३ व ५४ च्या हद्दीपर्यंत नंतर स.नं.५४ व ५३ च्या पश्‍चिम-उत्तर हद्दीपर्यंत, आणि स.नं.५२ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत, तरफ देशमुख स.नं.३० च्या पश्‍चिम-उत्तर हद्दीपर्यंत, उत्तर बाजु तरफ पिंगळे स.नं.२१२ च्या उत्तर हद्दीपासून, नंतर स.नं.२१२ च्या पुर्वेच्या हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१०८ पश्‍चिम-उत्तर हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१०५ च्या उत्तर व पूर्व हद्दीपर्यंत, स.नं.१०७ व ११० च्या उत्तर हद्दीपर्यंत, तरफ खोड स.नं.९२ व ९४ च्या उत्तर हद्दीपर्यंत, तरफ बोबडे स.नं.१८६ च्या उत्तर हद्दीपर्यंत, स.नं.१८७ (भाग) च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत आणि स.नं.१८७ च्या उत्तर हद्दीपयर्ंत, तरफ खोड – स.नं.१९४ उत्तर हद्दीपर्यंत, तरफ बोबडे स.नं.१८८ (भाग) च्या उत्तर हद्दीपर्यंत, नंतर स.नं.२०८ च्या पश्‍चिम-उत्तर व पुर्व हद्दीपर्यंत, नंतर स.नं.२०८ उत्तर हद्दीपर्यंत, तरफ बलगुजार स.नं.२१७, २१५ च्या उत्तर हद्दीपर्यंत आणि स.नं.९ तरफ बोबडेच्या पश्‍चिमेकडील हद्दीलगत, नंतर स.नं.५ च्या तरफ बलगुजारच्या उत्तर व पूर्व हद्दीलगत, नंतर स.नं.३ तरफ बोबडेच्या दक्षिण हद्दीलगत, तरफ देशमुख स.नं.१०, १६, २९ आणि ४०, तरफ गिराम स.नं.२९, ४० ते ४३, ५२ ते ६०, ६२, ९७ ते ९९, १०४, १०८ अनुसूची ब पुर्वेस तरफ बोबडे स.नं.५७, ११३ च्या पूर्व हद्दीपासून नंतर स.नं.११३ च्या उत्तर हद्दीपर्यंत, नंतर १२२, १२१ व १२० च्या पूर्व हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१२० (भाग) च्या दक्षिण हद्दीपर्यंत, स.नं.१५१ च्या पूर्व हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१५२ (भाग) व १४९ च्या उत्तर हद्दीतील आणि नंतर स.नं.१४९ त १४८ च्या पूर्व हद्दीपर्यंत तसेच तरफ खोड स.नं.२४ च्या पूर्व हद्दीपर्यंत नंतर स.नं.३५ च्या उत्तर हद्दीपर्यंत आणि स.नं.३४ च्या पूर्व हद्दीपर्यंत तसेच दक्षिण बाजुस तरफ देशमुख स.नं.१६च्या दक्षिण हद्दीपासून नंतर स.नं.१० (भाग) च्या पूर्व हद्दीपर्यंत आणि याच स.नं.१० च्या दक्षिण हद्दीपर्यंत तसेच तरफ पिंगळे स.नं.२१ (भाग) च्या पूर्व हद्दीपासून नंतर स.नं.२१ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, नंतर १८ (भाग) च्या पूर्व हद्दीपासून नंतर स.नं.१८ च्या पूर्व दक्षिण हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१०३,१०२ व ९९ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, नंतर स.नं.९९ च्या पश्‍चिम हद्दीपर्यंत आणि नंतर स.नं.९८ व १०७ (भाग) च्या दक्षिण हद्दीपर्यंत, तरफ बलगुजार स.नं.७ च्या पूर्व व दक्षिण हद्दीपर्यंत नंतर स.नं.८ (भाग) च्या पूर्व हद्दीपर्यंत, नंतर स.नं.८,९, ८३, ८२, ८८, ८९, ९० आणि ९१ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, नंतर स.नं.१०१ च्या पूर्व हद्दीपर्यंत आणि स.नं.१०१, १०० आणि ९४ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, तरफ पिंगळे स.नं.३४ च्या दक्षिण व पश्‍चिम हद्दीपर्यंत नंतर स.नं.१५९ च्या दक्षिण हद्दीपर्यंत नंतर स.नं.१५८ च्या दक्षिण हद्दीपर्यंत, नंतर स.नं.९ तरफ बोबडेच्या (भाग) पश्‍चिम हद्दीपर्यंत आणि नंतर स.नं.२ तरफ बलगुजारच्या उत्तर व पश्‍चिम हद्दीलगत, स.नं.६ तरफ बलगुजारच्या दक्षिण हद्दीलगत, नंतर स.नं.६ बोबडेच्या दक्षिण बलगुजारच्या दक्षिण हद्दीलगत, नंतर स.नं.६ तरफ बोबडेच्या दक्षिण आणि पश्‍चिमेकडील हद्दीलगत, नंतर स.नं.११३ (भाग) तरफ बोबडेमधून जाणार्‍या रस्त्यालगत व स.नं.११४, तरफ बोबडेच्या उत्तर पुर्व हद्दीलगत आणि त्यानंतर स.नं.११३ तरफ बोबडे स्थित शासकीय तंत्रनिकेतन बीडच्या दक्षिण व पश्‍चिम हद्दीलगत, नंतर स.नं.७ बलगुजार तरफ बलगुजार आणि स.नं.१० तरफ बोबडेच्या पुर्वेकडील हद्दीलगत तरफ बोबडे स.नं.५२ व ५५ च्या उत्तर हद्दीपर्यंत नंतर स.नं.५७ च्या पश्‍चिम व उत्तर हद्दीपर्यंत अशा प्रकारे हद्दवाढ झाली असून अनेक नागरिकांना आपण कोणत्या सर्व्हे नंबर मध्ये आहोत? बीड शहरात आहोत की ग्रामीण भागात आहोत याची माहिती व्हावी म्हणून दै.रिपोर्टरने स्पेशल ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

अर्धा शहरात अर्धा ग्रामीण भागात
शहराची हद्दवाढ विचित्र झालेली आहे यात काही शंकाच नाही. ज्याअर्थी शहरातीलच उस्मानपुरा सारखा भाग दुर्लक्षित आहे. तर मग असे अनेक भाग आहेत की, नगर पालिका व त्यांची योजना तिथपर्यंत पोहचलीच नाही. बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गयानगर याचे सर्व्हेक्षण केले तर अर्धे गयानगर शहरात आणि अर्धे गयानगर ग्रामीण भागात म्हणूनच अशा अनेक भागाचा विकास खुंटलेला असावा. त्या भागातील नागरिकांना आपल्या कामासाठी ग्रामपंचायत व नगर पालिका दोन्हीकडे चकरा माराव्या लागतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकी दरम्यान शहरातील मतदारांची नावे ग्रामीण भागात व ग्रामीण भागातील ग्रामस्थांची नावे शहरी भागात अशा तक्रारीही निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. जर हद्दवाढीचा प्रस्ताव जुना नसता तर असा गोंधळ झाला नसता अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत असून याकडे नगर पालिकेने विशेष लक्ष देवून हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करावा अशी मागणी या जनतेतून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!