बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाला आज प्राप्त झालेल्या अहवालात २१ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
१ फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाला ५४२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालामध्ये ५२१ जण निगेटिव्ह तर २१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड तालुक्यातील असून ते तब्बल १२ आहेत. त्यापाठोपाठ अंबाजोगाई, केज प्रत्येकी ३ तर माजलगाव २ आणि परळीत एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान दररोज बीड जिल्ह्यात संशयीत रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. आज ३८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.