Saturday, November 27, 2021
No menu items!
HomeUncategorizedबनावट दस्ताऐवज तयार करून महसूल विभागाने १०० एकर जमीन हस्तांतर केली

बनावट दस्ताऐवज तयार करून महसूल विभागाने १०० एकर जमीन हस्तांतर केली


दोषींविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शंभर एकर जमीन बनावट दस्ताऐवज तयार करून हस्तांतरीत करण्यात आली. याला महसूल विभाग कारणीभूत असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.
सर्वे नं. ७५, ७६, ७७, ८१, ८१/१ येथील शंभर एकर जमीन खोटे दस्ताऐवज तयार करून हस्तांतरीत करण्यात आली. सदरील ही जमीन देवस्थानाची आहे. या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यां-विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये गणेश ढवळे, शेख युनुस, शेख अनिस, शेख दस्तगीर, शेख गुलाम, शेख रशीद मोहम्मद, शेख चांद, शेख हजरत, शेख नियाज यांच्यासह आदींची उपस्थिती असून या उपोषणामध्ये महिलांनीही हजेरी लावली आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांसह बीडचे पालकमंत्र्यांसह अल्पसंख्याक विभागाला देण्यात आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!