Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईलॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं मोदी सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं -रोहित...

लॉकडाउनमध्ये मदत न देण्याचं मोदी सरकारचं कारण ऐकून मन सुन्न झालं -रोहित पवार


मुंबई (रिपोर्टर): देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात येतो. यंदाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला असून, अनेक महत्त्वाच्या बाबी यातून दिसून आल्या आहेत. याच अहवालातील एका मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. या काळात सर्वच ठप्प झाल्यानं अनेकाचे रोजगार गेले. तर हातावर पोट भरणार्‍यांना पुन्हा घर गाठावं लागलं होतं. या काळात सरकारनं थेट आर्थिक मदत करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र, सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर थेट आर्थिक स्वरूपात मदत न करण्याचं कारण आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलं आहे. त्यावरून रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. करोनाच्या सुरुवातीला मजूरवर्ग उन्हातान्हात चालत जाताना, नोकरदार पगाराअभावी हलाखीत जगत असताना केंद्र सरकारने मदत दिली नाही. कारण तेव्हा दिलेली मदत वाया गेली असती, असं आर्थिक पाहणी अहवालातील निरीक्षण वाचून मन सुन्न झालं. असा विचार करणं कितपत योग्य आहे?, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!