Home क्राईम कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या


नेकनूर (रिपोर्टर)- खासगी लोकांचे पैसे कसे द्यायचे या चिंतेतून एका २३ वर्षीय तरुण शेतकर्‍याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारवाडी येथे घडली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दत्ता सखाराम सालगुडे या शेतकर्‍याकडे काही लोकांचे पैसे होते. या पैशाची परतफेड कशी करायची? या चिंतेत सदरील शेतकरी असायचा. रात्री त्याने अकराते तीन वाजण्याच्या दरम्यान आपल्य राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिस कर्मचारी ढाकणे, खांडेकर, राठोड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. नेकनूर ठाण्यात प्रथमदर्शनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version