Home बीड लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,हितचिंतकांची तोबा गर्दी

लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,हितचिंतकांची तोबा गर्दी

आ.सुरेश धस यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने साजरा
आष्टी (रिपोर्टर):- आष्टी मतदार संघात विविध ठिकाणी रक्तदान,आरोग्य तपासणी,शालेय साहित्य वाटप,रुग्णांना फळे वाटप,क्रीडा स्पर्धा,यासह विविध सामाजिक उपक्रमाने विधानपरिषदेचे आ. सुरेश धस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्तांनी त्यांच्या अद्वैतचंद्र निवासस्थानी तोबा गर्दी केली होती.वाढदिवसानिमित्त आष्टी मतदार संघात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड-लातुर-उस्मानाबाद विधानपरिषदेचे आ. सुरेश धस यांचा ५१ वा वाढदिवसानिमित्त दि. २ फेब्रुवारी रोजी आष्टी विधानसभा मतदार संघासह बीड लातुर उस्मानाबाद या जिल्हातील हजारो कार्यकर्तांसह अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सकाळी ७ वाजल्यापासून धस यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.त्यांनी हार तुरे यांवर होणार खर्च टाळुन पुस्तक रुपी शुभेच्छा स्विकारल्या जातील कार्यकर्ते हितचिंतकांनी बुके ऐवजी बुक देऊन गोर गरिब यांना जिवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत हितछिंतकांनी निवास्थानाच्या प्रांगणात शुभेच्छुकांच्या हातामध्ये वेगवेगळी पुस्तके दिसत होती.शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्तांना धस यांच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही हजारोंच्या संख्येने शुभेच्छुक असतानाही शुभेच्छुक लहान असो किंवा मोठा असो त्यास फोटो घेण्यासाठी वेळ दिला.त्यांच्या वाढदिवासानिमित्त आष्टी पंचायत समिती कार्यालयामध्ये दोन दिवस उद्या दि.३ व ४ रोजी लावणी महोत्सव,कुसळंब येथील आण्णा महोत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, समाजप्रबोधनकार ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी कार्यकर्तांनी रुग्णांना फळे वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शाळेतील विद्यार्थ्यांच्या कबड्डी,खो-खो,यांसारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करून सामाजिक उपक्रमाने आ. सुरेश धस यांचा वाढदिवस साजरा झाला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version