बीड (रिपोर्टर):- गेल्या काही दिवसापासून कोरोना रूग्णांची संख्या कमी जास्त प्रमाणात वाढत आहे. आज आरोग्य विभागाला ५२० संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून या अहवालामध्ये पंधरा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
गेल्या चार-पात दिवसापूर्वी शाळा उघडण्यात आल्या आहेत. रात्री ९.३० च्या नंतर आजही दुकाना बंद कराव्या लागत आहेत. आता कोरोना हळुहळु कमी होवू लागला असून आज आलेल्या अहवालात पंधरा जण पॉझिटिव्ह तर ५०५ जण निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई २, आष्टी १, बीड ८, केज २, परळी तालुक्यात २ रूग्ण आढळून आले आहेत.