Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमशिवशाही बसने वृध्द महिलेला चिरडले केजच्या बसस्थानकासमोर घडली दुर्देवी घटना

शिवशाही बसने वृध्द महिलेला चिरडले केजच्या बसस्थानकासमोर घडली दुर्देवी घटना


केज (रिपोर्टर) भरधाव वेगात निघालेल्या शिवशाही बसने एका वृध्द महिलेस जोराची धडक दिल्याने त्या वृध्द महिला जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी केजच्या बसस्थानकासमोर घडली. महिलेच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. अपघात इतका भिषण होता की पाहणार्‍याचे र्‍हदय हेलावून गेले होते.
काशीबाई रामभाऊ थोरात (रा.बनकरंजा) ही वृध्द महिला बसस्थानकातून रूग्णालयाकडे पायी जात होती. यावेळी अंबाजोगाईकडून बीडकडे निघालेली शिवशाही बस एम.एच.09 एफ.एल.1042 ने महिलेस जोराची धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली. अपघात इतका भिषण होता की महिलेच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी रक्तमासाचा सडा पडला होता. याप्रकरणी चालकाविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!