Saturday, March 6, 2021
No menu items!
Home देश विदेश मोदी सरकार, आंदोलक शेतकरी आहेत की दहशतवादी?

मोदी सरकार, आंदोलक शेतकरी आहेत की दहशतवादी?

शेतकर्‍यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर भिंती उभारल्या, रस्त्यात खिळे रोवले, तारांचे कुंपण लावले,
लोखंडी खांब आडवे टाकले, बॅरिकेट् टाकून आंदोलकांना दिल्ली बंदी, इतिहासात प्रथमच एखाद्या आंदोलनाविरोधात

सरकारने घेतले टोकाचे पाऊल, देशभरात शेतकर्‍यांबाबत सहानुभूती तर भाजपा विरोधात संताप
दिल्ली (रिपोर्टर)- कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी दिल्लीत घुसू नयेत म्हणून दिल्लीच्या सिमांवरच म्हणजेच सिंधू, टिकरी आणि गाझियापूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फुट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या असून राष्ट्रीय महामार्गावर कॉंक्रेट बांधकामाबरोबर अनेक ठिकाणी लोखंडी खांब, तारा, खिळे आणि बॅरिकेट् टाकून आंदोलक शेतकर्‍यांची कोंडी केली जात असल्याने भाजप सरकार आंदोलक शेतकर्‍यांकडे शेतकरी म्हणून पाहतय की, दहशतवादी म्हणून पाहतय ? असा संतप्त सवाल देशभरातून विचारला जात आहे. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांचे विज, पाणी बंद केल्याने आंदोलक शेतकर्‍यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत.

1 1

राष्ट्रीय महामार्गांवर कॉंक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारुन दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र यामुळे आता शेतकर्‍यांना दिल्ली सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंतही पोहचता येत नाहीय. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजांपासूनही वंचित असल्याचे चित्र दिसत आहे.

3 1

गरज पडली तर
बोअरवेल खोदू

दिल्ली पोलिसांनी या भिंती उभारल्याने शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागत असला तरी आपण मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर आम्ही पाण्यासाठी बोरवेल खोदू. पाण्याचा पुरवठा बंद केल्याने आम्ही मागे हटू असा विचार सरकारने करु नये. आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत गावी परत जाणार नाही, असं पटीयाला येथून आंदोलनासाठी आलेल्या कुलजीत सिंग या शेतकर्‍याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे.

3444

तर ४० लाख ट्रॅक्टर रॅली
देशभरात काढू -टिकैत

नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकर्‍यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे. यादरम्यान भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला असून भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने जर आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही मोठी ट्रॅक्टर रॅली काढू असं ते म्हणाले आहेत. आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरु राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असं राकेश टिकैत यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

barricades 6 830x467 1

महिलांना सहन करावा
लागत आहे त्रास

दिल्ली-चंढीगड सीमेवर शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंढीगडच्या बाजूनेही काही शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र शौचालयांची संख्या आणि शेतकर्‍यांची संख्या यामुळे शौचालय वापरण्यासाठी शेतकर्‍यांना बराच वेळ वाट पहावी लागत आहे.

barricades 5 830x467 1

याच कारणामुळे अनेक शेतकरी आता उघड्यावर शौचाला जात आहेत. महिला आंदोलकांची संख्याही जास्त असल्याने उभारण्यात आलेली शौचायले त्यांना वापरलाय देण्यास प्राधान्य दिलं जात आहे. हरयाणा दिल्ली सीमेजवळ हरयाणाच्या बाजूला कचर्‍याचा साठा वाढू लागला आहे.

barricades 2 830x467 1

शेतकर्‍यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेल्या लंगरमध्ये वापरण्यात आलेली ताट, वाट्या आणि इतर एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारा कचरा येथील रिकाम्या जागी नेऊन जाळून नष्ट केला जात आहे.

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...