नेकनूर (रिपोर्टर) बीड तालुक्यातील रत्नागिरी येथील शाळेच्या परीसरात आज दि. ३ फेब्रुवारी रोजी खेळायला गेलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह अंबाजोगाईला पाठवण्यात आला आहे.
रत्नागिरी येथील राज मोतीराम सपकाळ हा पाच वर्षाचा मुलगा आज सकाळी साडेदहा वाजता त्याच्या आजोबाकडून पाच रूपये घेऊन शाळेच्या परिसरात खेळण्यासाठी गेला होता. त्यानंतर सकाळी पावणेअकरा वाजता तो शाळेच्या परिसरात पडलेला शिक्षकांना दिसला. शिक्षकांनी याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर त्याला नेकनूर येथील दवाखान्यात नेण्यात आले. नेकनुर येथे मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने अंबाजोगाईला शवविच्छदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी नेकनूर ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांाच्यासह पोलिसांनी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशाने झाले हे स्पष्ट होइल. नातेवाईकांनी घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.