बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील रुईलिंबा येथील एका १६ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल पाच वाजता घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कोमल राधाकिसन माळी (वय १६, रा. रुईलिंबा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने अज्ञात कारणावरून काल पाच वाजता स्वत:च्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी ग्रामीणचे पीएसआय पवन राजपूत, रोकडे, जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला. कोमलने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नाही.