Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईम‘त्या’ चिमुकल्याचा खूनच

‘त्या’ चिमुकल्याचा खूनच


गळ्यावर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला, पोलिसांकडून तपास सुरू
नेकनूर (रिपोर्टर)- नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी येथे काल एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे स्पष्ट होत नसल्याने स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात गळ्यावर दाब पडल्याने मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले असल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान केले असून एका दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदरचा प्रकार हा अंधश्रध्देतून झाल्याची चर्चा आहे. त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

nekanur


रत्नागिरी येथील शुभम मोतीराम सपकाळ हा पाच वर्षीय चिमुकला त्याच्या बहिणीसोबत शाळेच्या परिसरात खेळण्यासाठी गेला होता. सकाळी अकरा वाजता तो शाळेच्या परिसरात बेशुद्ध आढळून आल्याने शिक्षक आणि नातेवाईकांनी त्याला नेकनूरच्या दवाखान्यात दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले होते. नेमका त्याचा मृत्यू का आणि कशामुळे झाला हे स्पष्ट होत नव्हते. मृतदेह स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये स्पष्ट गळ्यावर दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल आला आहे. नेमका त्याचा खून कोणी आणि का केला? याचा तपास पोलिस करत आहेत. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे नेकनूर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!