Saturday, March 6, 2021
No menu items!
Home बीड सेनेच्या बोंबमारो आंदोलनाने बीड शहर दणाणले

सेनेच्या बोंबमारो आंदोलनाने बीड शहर दणाणले

बीड/ (रिपोर्टर)-केंद्रीय अर्थ संकल्पानंतर महागाईचा भडका आणखी उडाला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर तब्बल २५ रुपयांनी वाढले आहेत. तर पेट्रोल आणि डिझेल कोणत्याही क्षणी १०० रुपयाच्या पार होवू शकते. कोरोनाच्या कहरामुळे अगोदरच जनता हैराण असताना आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कायम दरवाढ करण्याचे धोरण आखले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणा विरुध्द आणि महागाईच्या या भडकणार्‍या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली नगर नाका परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आले. केंद्र सरकारच करायच काय खाली डोकं वर पाय, पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करा- कमी करा, धिक्कार असो धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार असो,सर्वसामान्यांचे जीवन अधिक कष्टप्रद करणार्‍या केंद्र सरकारचा जाहिर निषेध असो , आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणाबाजीने शहर दणाणले. या आंदोलनात शिवसैनिकांनी सायकल मार्च काढून आता केवळ सायकलनेच फिरायचे का? असा प्रश्न विचारत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, माजलगाव – पेट्रोल-डिझेल दर वाढी विरोधात आज माजलगाव शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

sena


सर्वसामान्य जनतेचे हित जोपण्याचे सुत्र हाती घेवून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी जनहिताचे निर्णय घेण्याचा धडाका कायम ठेवला आहे. परंतु केंद्र सरकार सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचे एक कलमी धोरण राबवत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर दररोजच नवीन आकडे दाखवत आहे. पेट्रोल आणि डिझेल ही होणारी दरवाढ सर्वसामान्यांना आकडी भरवत आहे. गेल्या आठ महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे अगोदर मोडलेले असताना भाजप प्रणित केंद्र सरकार कडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे भारतात आहेत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सतत पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच आहे. आता पेट्रोल आणि डिझेल लवकरच शंभरी पार करेल हे नक्की. केंद्र शासनाकडून होणार्‍या महागाईच्या या भडकणार्‍या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली नगर नाका रोड बीड येथील चौकात ठिय्या आंदोलन तसेच सायकल मार्च काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच करायच काय खाली डोकं वर पाय, पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करा -कमी करा, धिक्कार असो धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार असो,सर्वसामान्यांचे जीवन अधिक कष्टप्रद करणार्‍या केंद्र सरकारचा जाहिर निषेध असो अशा घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख ऍड.संगिताताई चव्हाण,जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे,उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ पिंगळे,हनुमान जगताप, आशिष मस्के, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, नगरसेवक भीमराव वाघचौरे,नितीन धांडे, तालूका प्रमुख गोरख सिंघन,राजेंद्र राऊत, शहर प्रमुख सुनिल सुरवसे,अर्जुन नलावडे, अरुण नाना डाके,रतन गुजर,रामसिंग टाक,नगरसेवक शुभम धुत,धनंजय वाघमारे, राहुल साळुंके, कल्याण कवचट, हनुमानप्रसाद पांडे, सखाराम देवकर, परमेश्वर डाके,पंजाब काकडे,अविनाश पुजारी, सोनू कवडे,काकासाहेब जाधव,संदीपान बडगे, कामरान शेख, गणेश घोडके,सुमंत रुईकर,आबा घोडके, राजू टाक,पांडूरंग गवते,शुभम कातांगळे, महारुद्र वाघ,विवेक जाधव,विशाल घरत,प्रविण कथले, महिला आघाडीच्या गोरे ताई, शेख फरजाना, चंद्रकलाताई बांगर, सुमनताई गोरे, सारिका काळे तसेच आदिंसह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजलगावातही पेट्रोल-डिझेल दर वाढी विरोधात आज माजलगाव शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, बाळासाहेब मेंडके, विक्रम सोळंके, माऊली कदम, सुरेश जाधव अभिजित कोंबडे, सुनिलराव खंडागळे.

Most Popular

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...