वीज बिल वाढीच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
गेवराई (रिपोर्टर) महावितरणने राज्यभरात 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे काम करत आहे, याचा निषेध म्हणून संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज महावितरणच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असून याच धर्तीवर गेवराई येथे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली वीज महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून हल्लाबोल आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी आ.लक्ष्मण पवार, जि. प.सदस्य पांडुरंग थडके, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, पंचायत समिती सभापती दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, राजेंद्र भंडारी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, पंचायत समिती सदस्य प्रा.शाम कुंड, युवा नेते कारण जाधव, नगरसेवक राहुल खंडागळे, संचालक सचिन मोटे,ब्रह्मदेव धुरंधरे, बंडूभाऊ बारगजे, बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक भारत गायकवाड,ईश्वर पवार, समाधान मस्के, गोरख मोटे, कैलास पवार, किशोर कोकरे, नितीन शेटे,विलास सुतार, कृष्णा ढाकणे, संतोष सुतार, अनिल साळवे, संजय ढोणे, कैलास जवंजाळ यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान यावेळी महावितरण विभाग व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.