बीड रिपोर्टर – कोरोना लॉकडाऊन काळामध्ये सामान्य जनता आर्थिक संकटात अडकली.राज्याच्या उर्जा मंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याचे जाहीर केले. परंतु ही घोषणा आज फोल ठरली. महावितरण कंपनीने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली. चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महावितरण कंपनी करत आहे. लॉकडाऊन काळात रिडींग न घेता भरमसाठ रकमेचे वीज बिल देण्यात आली. वीज बिलात सवलत मिळणार या आशेवरती बहुसंख्य वीज ग्राहकांनी विज बिल भरली नाहीत. विधानसभा अधिवेशन काळात वीज बिल सवलत देण्याचा पुनरुच्चार केला गेला. परंतु आज मात्र प्रत्यक्षात सक्तीतीने वीजबिल वसुलीचा तगादा महाविकास आघाडी सरकारने सुरू केला. सामान्य वीजग्राहकांना आधार देण्याऐवजी त्यांच्या घरात अंधार करण्याचे पाप महाआघाडी सरकार करत आहे. घोषणा केल्याप्रमाणे कोरोना काळातील वीजबिलात सवलत आणि वाढीव विज बिल दुरुस्त करून दंड व व्याजाची रक्कम वजा करून वीज बिल सवलत देवून, जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता असताना वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवणे हे आघाडी सरकार करून जनतेला आर्थिक आर्थिक खाईत ढकलण्याचे कृत्य आहे. सरकारने राज्यातील जनतेशी बेइमानी केली आहे.अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. महावितरणच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव तथा लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे प्रदेश उपाध्यक्ष्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनीच्या जालना रोड बीड येथील कार्यालयास टाळा ठोकून निषेध करण्यात आला.यावेळी भगीरथ बियाणी, प्रा.देविदास नागरगोजे,चंद्रकांत फड, डॉ.लक्ष्मण जाधव,शांतीनाथ डोरले,अनिल चांदणे,गणेश पुजारी,विलास बामणे,किरण बांगर,संध्याताई राजपूत,संगीताताई धसे, संजीवनी राऊत, भूषण पवार,ऋषी फुंदे, सरपंच वसंत गुंदेकर, अशोक घोलप, बद्रीनाथ जटाळ,नरेश पवार,संभाजी सुर्वे,शरद बडगे, संदीपान प्रभाळे, अनिल शेळके, इरशाद शेख, समीर बेग, सय्यद अमीर, नवीदभाई,पंकज धांडे,रवी कळसाने, कृष्णा बहिरवाळ आदी उपस्थित होते.