किल्ले धारुर (रिपोर्टर) केंद्र शासनाच्या पेट्रोल,डिझेल,गँस चे भाव विरोधात किल्ले धारुर तालुका शिवसेनेच्या वतीने मोटार सायकल ढकलत निदर्शने करत आंदोलन करुन तहसीलदार धारुर यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाने पेट्रोल,डिझेल,घरगुती गँस आदी जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढ केल्याने सर्व सामान्यांचे कष्टकरी शेतकरी मजुर महीला यांना आर्थीक भुर्दंड बसत असुन,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरुन,मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे,संपर्क प्रमुख मा.आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळुक यांच्या आदेशावरुन किल्ले धारुर तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध करत आंदोलन करत तहसीलदार धारुर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरुंद मा.तालुका प्रमुख विनायक ढगे,शहरप्रमुख बंडु शिनगारे,मा.नगराध्यक्ष शेषेरावजी फावडे,राजकुमार शेटे,बंडु बप्पा सावंत,बाबा सराफ,सुधीर आप्पा गुळवे,बालाजी शिंदे,नितिन भैया सद्दिवाल,सुनिल भांबरे,बाबा तिबोले,पुरुषोत्तम सोळंके,गणेश पवार,शरद उबाळे,विशाल सराफ,नितीन राऊत,विक्की घोडके,सह शिवसैनिक उपस्थितीत होते.