Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडमहाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टाच्या आडून मराठा समाजाचा छळ करतय -रघुनाथ चित्रे

महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टाच्या आडून मराठा समाजाचा छळ करतय -रघुनाथ चित्रे


बीडमध्ये संघर्ष यात्रेचे स्वागत; मराठा संघर्ष यात्रा आज साष्टपिंपळगावात धडकणार
बीड (रिपोर्टर)- महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत मराठा समाजातील मुलांना नोकर्‍यांपासून वंचित ठेवले. सारथी सारखी संस्था बंद पाडली, सरकार नुसत्या घोषणा करत आहे, मात्र निधी देत नाही, तलाठी, महावितरणमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती या सरकारने दिली नाही. सुप्रिम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने त्यांच्या आडून महाराष्ट्र सरकार मराठा समाजाचा छळ करत आहे., असा घणाघाती आरोप मराठा मोर्चाचे समन्वयक रघुनाथ चित्रे यांनी केला. बीड येथील वैष्णव पॅलेस येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी साष्टपिंपळगाव येथील संपुर्ण गावकरी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबादेण्यासाठी पुणे येथून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रघुनाथ चित्रे यांनी मराठा संघर्ष यांनी ४ फेब्रुवारी रोजी काढली असून आज ते बीडमध्ये आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले की, सुप्रिम कोर्टा व्यतिरिक्त मराठा समाजाचे इतर प्रलंबीत प्रश्‍न आहेत. ते प्रश्‍न महाराष्ट्र सरकार जाणीवपुर्वक सोडत नाही. सारथीसाठी २० कोटी रुपये दिल्याची घोषणा या सरकारने केली मात्र निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. सुप्रिम कोर्टात फक्त आरक्षणाचा विषय सुरू आहे बाकी इतर विषय महाराष्ट्र सरकारच्या हाती आहेत. सरकार कुठलेही असो आमचा लढा हा सरकारच्या विरोधात आहे. आता आम्ही न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाहीत. २०१६ साली जसे मोर्चे निघले त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा लाखोंच्या संख्येने आम्ही एकत्र येणार आहोत. आयोगच बोगस म्हणणार्‍या वडेवट्टीवारांचा राजीनामा घ्यावा, असेही चित्रे म्हणाले. आज संघर्ष यात्रा घेऊन ते बीडमध्ये आले होते. या वेळी त्यांनी वैष्णव पॅलेस येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला बीडमधील मराठा समन्वयकांची उपस्थिती होती. संघर्ष यात्रा आज सकाळी बीडमधून गेवराई मार्गे मालेगाव येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांना भेट देऊन साष्टपिंपळगाव येथे धडकणार आहे. आज सुप्रिम कोर्ट मराठा आरक्षणावर निर्णय देणार आहे, त्यांचा निर्णय जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचे स्वागत करून जल्लोष साजरा केला जाणार आहे, नसता आंदोलनाची पुढील रणनीती ठरवून ते अधिक अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेला सी.ए. जाधव, अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, अशोक सुखवसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!