Friday, March 5, 2021
No menu items!
Home बीड ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गहिनीनाथ गडावर महापुजा संतांच्या दर्शनाने ईश्‍वर प्राप्ती होते...

ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गहिनीनाथ गडावर महापुजा संतांच्या दर्शनाने ईश्‍वर प्राप्ती होते -धनंजय मुंडे

माजी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एका व्यासपीठावर
पाटोदा/बीड (रिपोर्टर)- संतांच्या केवळ दर्शनाने ईश्‍वर प्राप्ती होते, संत दर्शनाचा हा लाभ असतो. गेले अनेक वर्षे मी हा लाभ घेत आहे तो अखंडपणे घेत राहील, असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ यांच्या समाधीशी नतमस्तक झाले. आज ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पहाटे संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त महापुजा झाली. आज माजी मंत्री पंकजा मुंडे आणि ना. धनंजय मुंडे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. ज्यांच्या हातात सत्ता मिळाली आहे ते नक्कीच चांगला विकास करतील, यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले. तर त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील, असा विकास करू, असे धनंजय मुंडे यांनी या वेळी म्हटले.

9802796f f3de 4cd8 b04f b3b40b68c074


राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वै. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज महापुजा करण्यात आली. पहाटेच्या दरम्यान ही महापुजा मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या वेळी धनंजय मुंडेंनी म्हटले, प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी वै.संत श्री वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गहिनीनाथ गडावर आयोजीत महापुजेस उपस्थित राहिलो. संतांच्या केवळ दर्शनाने ईश्‍वर प्राप्ती होते, संत दर्शनाचा हा लाभ असतो. गेली अनेक वर्षे मी हा लाभ घेत आहे व अखंडीतपणे घेत राहील. गहिनीनाथ गडावरील आजच्या पुण्यतिथी सोहळ्यास माजी मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित आहेत. त्यांनीही संत वामनभाऊंचे दर्शन घेतले. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात दोघे बहिण-भाऊ एका व्यासपीठावर असून ना. धनंजय मुंडे यांच्या समोर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आता ज्यांच्या हातात सत्ता मिळालीय ते नक्कीच चांगला विकास करतील , असं म्हणत शुभेच्छा दिल्या. यावर धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, माजी पालकमंत्री म्हणाल्या, आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या, त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील, असा विकास करू, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Most Popular

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

आज चौघांचा तर तिन दिवसात सात बाधितांचा मृत्यूबीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसून येत असून रोज कोरोना बाधीत...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास...

तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले

बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...