Friday, March 5, 2021
No menu items!
Home बीड झेडपी सदस्य ते कॅबिनेट मंत्री हा भाऊंच्या आशीर्वादाचा प्रसाद-ना.मुंडे

झेडपी सदस्य ते कॅबिनेट मंत्री हा भाऊंच्या आशीर्वादाचा प्रसाद-ना.मुंडे

संत वामनभाऊंच्या संस्काराची ज्योत तेवत ठेवू-पंकजाताई मुंडे
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ चा ४५ वा पुण्यतिथी महोत्सवाला भक्तांची मांदियाळी
पाटोदा (रिपोर्टर):- संतश्रेष्ठ वैकुंठवासी संत वामन भाऊंच्या ४५ पुण्यतिथी महोत्सवापैकी सतरा वर्ष पूजा करण्याची संधी मला मिळाली; त्याबद्दल मी महंत विठ्ठल महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो; सतरा वर्षांपूर्वी मी झेडपी सदस्य होतो महाराजांनी आज्ञा दिली आणि पूजेचा नियमच बनला… आज हे पूजेचे सतरावे वर्ष आहे. झेडपी सदस्य ते कॅबिनेट मंत्री हा माझा प्रवास केवळ संत वामन भाऊंच्या कृपाशीर्वादाने आहे अशी भावनिक साद घालत भाऊ व बाबांचे आशिर्वाद मानवी जीवनाला आनंद आणि समाधान देतात असे भावोद्गार महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले; तर संत वामन भाऊं चा पुण्यतिथी चा हा अत्यंत मौल्यवान क्षण असून श्रद्धेपोटी आपण या ठिकाणी येतो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी निर्माण केलेली या ठिकाणी येण्याची परंपरा मी अखंड जोपासते भाऊंच्या संघर्षाची आणि संस्काराची ज्योत आपण जीवनभर तेवत ठेवू असा आत्मविश्वास माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
वैराग्यमूर्ती वाचासिद्धी संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता आज श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली, त्यावेळी व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे माजी मंत्री जयदत्त अन्ना क्षीरसागर आमदार बाळासाहेब आजबे काका माजी आमदार दरेकर नाना आमदार मोनिका राजळे माजी आमदार भीमराव धोंडे बजरंग बप्पा सोनवणे सतीश आबा शिंदे, सभापती काकासाहेब लांबरुड, जयदत्त भैय्या धस, गोवर्धनराव सानप आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती
नामदार धनंजय मुंडे म्हणाले, संत वामनभाऊंच्या गादीची किमया मोठी आहे झेडपी सदस्य ते कॅबिनेट मंत्री हे सर्व यश भाऊंची प्रमाणिकपणे भक्ती आणि त्यामुळेच ही शक्ती आहे. इथे प्रत्येक जण श्रद्धेने येतो कोरणा सारखे संकट आले तरी जीव गेला तरी चालेल पण भाऊ वरील श्रद्धा मात्र कमी होत नाही हे यावरून सिद्ध आहे. या व्यासपीठावरून जबाबदारीने बोलावे लागते जे बोलले ते करावे लागते आणि म्हणून गेल्या काही काळामध्ये पंचवीस कोटी ची घोषणा झाली त्यापैकी दोन कोटी मिळाले.बाकी जे राहिले आणि त्यात आणखी पाच कोटी घालून एक भक्त म्हणून मी या गडाची सेवा करतो, असे जाहीर करतात च प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना प्रतिसाद मिळाला.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या हा पुण्यतिथी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. तुम्ही सर्वजण भाऊंच्या स्वरूपात आहात. तुमच्या दर्शनाने आनंद झाला. मी यंदा केवळ भक्त म्हणून आले. कर्माचेआशीर्वाद आणि फळे मिळतात. मला या निमित्ताने स्व.मुंडे यांची आठवण येते आणि भाऊबाबांचे देखणे स्वरूप हे मानवाचा धर्म हा सत्कार्यासाठी असतो हे संतांनी सांगितले आहे संतांनी संयम दिला क्षमा भाव धरा. भाऊंच्या संघर्षाची ज्योती आपण सर्वजण जीवनात तेवत ठेवू. तुकारामांच्या ओव्या मला आवडतात त्यांचे वाचन मी करते याचा संदर्भ देत त्यांनी ओवी प्रत्यक्ष गाऊन दाखवली. भाऊ आपले आदर्श आहेत त्यांच्या आशीर्वादाने खाली आपण जनतेची सेवा करूया स्वाभिमान मुंडेंनी दिला तो झोपूया अशी अपेक्षाही करून पंकजाताई मुंडे भावुक झाल्या. यावेळी व्यासपीठावर खा.प्रितमताई मुंडे, मा.मंत्री जयदत्त क्षिरसागर, आ.बाळासाहेब आजबे, मा.आ. भिमरावा धोंडे, जयदत्त धस, बजरंग बप्पा सोनवणे, आप्पासाहेब राख, शिवभुषण जाधव, विठ्ठल सानप, गोवर्धन सानप, बन्शिसी खाडे ,शिवाजी भवर, मंगेश पवार, संत वामन भाऊ ग्रंथाचे चरित्रकार गोसावी संतोष घोडके लक्ष्मण पोकळे, बडे खेडकर आदी सह उपस्थित होते.

Most Popular

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

आज चौघांचा तर तिन दिवसात सात बाधितांचा मृत्यूबीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसून येत असून रोज कोरोना बाधीत...

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

बीड (रिपोर्टर)- काल नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन दीड तोळ्याचे गंठण लंपास...

तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले

बीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...