बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती चंपावती नगरी (बीड शहर) आज महत्त्वपुर्ण बैठक आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या बैठकीसाठी शासकीय विश्रामगृह येथे शिवप्रेमींनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे. सदरची बैठक ही सायंकाळी 5 वाजता आयोजित केली गेली आहे.
गेल्या पाच वर्षापासून बीडमध्ये वर्गणीमुक्त शिवजयंती काढण्यात येत आहे. आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजन्मोत्सव साजरा होत असून आजपर्यंत शिवजयंती निमित्त अनेक मर्दानी खेळ दाखवण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून त्या निमित्ताने शिवजयंतीची आगामी रणनिती ठरवण्यासाठी सायंकाळी 5 वजाता शासकीय विश्रामगृह येथे आ.संदिप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे. या बैठकीसाठी शहरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गेल्या वर्षीचे अध्यक्ष अक्षय जाधव यांनी केली आहे.