Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईघमंड ज्यादा हो तो हस्तियॉं डूब जाती है’

घमंड ज्यादा हो तो हस्तियॉं डूब जाती है’


संजय राऊतांनी ट्वीट केला ’हा’ शेर; रोख नेमका कोणाकडे?
मुंबई (रिपोर्टर)-शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे अनेकदा राज्यातील विविध प्रकरणांवर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतात. मात्र, आज त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. सिंधुदुर्गात अमित शहा यांच्या सभेनंतर राऊत यांनी एक शेर ट्वीट केला आहे. त्यामुळं त्यांचा रोख अमित शहा यांच्याच दिशेनं असल्याची चर्चा आहे.

अमित शहा यांनी काल शिवसेनेवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनीही काल सावध भूमिका घेत एक ट्विट केलं होतं. ’सन १९७५ मध्ये रजनी पटेल यांनी आणि ९० च्या दशकात मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. पुन्हा सन २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असेच म्हटले होते आणि दोन्ही वेळेस शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली, असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आहे.
संजय राऊत हे अधूनमधून आपल्या ट्विटर अकाउंटवर विविध प्रकरणांवर सूचक भाष्य करणारे शेर किंवा कवितेच्या ओळी टाकत असतात. त्यामुळं या प्रकरणावर ते काय ट्वीट करतात याकडं लक्ष लागलं होतं. आज संजय राऊत यांनी एक शेर ट्वीट केला आहे.
’तुफान ज्यादा हो तो
कश्तियां डूब जाती है
और घमंड ज्यादा हो तो
हस्तियॉं डूब जाती है’
असं त्यांनी म्हटलं आहे. या शायरीच्या नंतर जय हिंद, जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. शायरीतून त्यांनी नेमका कोणाला टोला हाणला आहे तसंच, या शायरीचा नेमका उद्देश काय, याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!