बीड (रिपोर्टर)- महाविकास आघाडी सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली मात्र या कर्जमाफीचा लाभ अद्यापही राज्यातील १ लाख ५१ हजार शेतकर्यांना मिळालेला नाही. सदरील या शेतकर्यांना मार्च एन्डपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सहकार विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दोन लाखापेक्षा कमी कर्जदार शेतकर्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. याचा लाभ राज्यभरातील लाखो शेतकर्यांना झाला. प्रशासकीय धोरणाच्या चुकीमुळे १ लाख ५१ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे समोर आले आहे. जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. त्या शेतकर्यांना मार्चपुर्वी कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येते.