बीड (रिपोर्टर)- मोमीनपुरा भागात असलेल्या टपरीमध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केली असून त्यातील साहित्यासह नगदी १० हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोमीन रजियोद्दीन (पि. गयासोद्दीन) यांची मोमीनपुरा भागामध्ये पान टपरी आहे. ६ फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्याने त्यांची टपरी फोडून आतील साहित्यासह नगदी असा एकूण १० हजार रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी टपरी चालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.