Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडकोणाच्या दबावाला, अमिषाला बळी पडू नका ये तो झाकी हैं, नगर पालिका...

कोणाच्या दबावाला, अमिषाला बळी पडू नका ये तो झाकी हैं, नगर पालिका बाकी हैं -आ.संदीपभैय्या

शिवसंग्रामला धक्का विनोद हातागळेंसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये
बीड (प्रतिनिधी):- शहरातील बलभीम नगर पेठ बीड भागातील शिवसंग्रामचे युवक नेते विनोद हातागळे व त्यांच्या शेकडो सहकार्‍यांनी आ.संदिप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पेठ बीड भागातील या प्रवेशाने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍या युवकांची संख्या वाढु लागली आहे. आगामी नगर पालिका निवडणूकीत आपल्याच विचारांची सत्ता असेल, कोणाच्या दबावाला, अमिषाला बळी पडू नका, ये तो झाकी हैं, नगर पालिका बाकी हैं जनतेचे आशिर्वाद आपल्या सोबत आहेत त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही असे प्रतिपादन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले.

sandip 2


पेठ बीड भागातील बलभीम नगर येथील विनोद हातागळे व त्यांच्या सहकार्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी सुनिल धांडे,आसारामभाऊ गायकवाड, अशोक वाघमारे, भाऊसाहेब डावकर, झुंजार धांडे, अशोक रोमण, इरफान बागवान, जयमल्हार बागल, सामाजिक कार्यकर्ते जावेदभाई कुरेशी, पंकज बाहेगव्हाणकर, प्रशांत जाधव, वाहेद खान, युवती अध्यक्ष विद्याताई जाधव, गणेश जाधव, अजय सुरवसे, सुशील जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.संदिप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. आपण शांत आहोत पण येणार्‍या काळात ही शांतता काय असते दाखवू देवू ज्येष्ठांचे आशिर्वाद, जनतेची साथ आपल्या सोबत आहे. येणार्‍या काळात आपल्या विचाराची नगर पालिका निवडणूकीत सत्ता असेल असा विश्‍वास व्यक्त करत कोणाला घाबरू नका, जोमाने कामाला लागा. या भागाचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली.

माता रमाई यांना अभिवादन
सम्राट अशोक बौद्ध विहार बलभीम नगर पेठ बीड येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आ.संदिप क्षीरसागर यांनी अभिवादन केले. यावेळी त्या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या भागातील बौद्ध विहार व इतर विकास कामे करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी देवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!