परळी (रिपोर्टर):- परळीहून परभणीकडे जाणार्या रेल्वे रुळावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. सदरचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय परळी येथे ठेवण्यात आला असून, पोलीस या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले असून या पत्रकात संबंधित इसमाचे वर्णन देण्यात आले आहे.
परळीतील संभाजीनगर पोलिस ठाणे अंतर्गत गणेश सुरेश दणाने यांच्या खबरीनुसार दिनांक ०८/०२/२०२१ रोजी सकाळी ०९:०० ते १०:०० वा.दरम्यान परळी ते परभणी जाणा-या रेल्वे लाईनवर कि.मी.क्रं. २७०/०-१ वर एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे.व तो मरण पावला आहे. वगैरे खबर वरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. अकस्मात मृत्यु क्रं. ०१/२०२१ कलम १७४ उीलि अन्वये नोंद आहे.अ.म.चा.तपास चालु आहे. यातील मयता विषयी काही माहीती मिळुन आल्यास खालील क्रंमाकावर संम्पर्क करावा असे कळविण्यात आले आहे. मयताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे, ०१) मयत अनोळखी ईसम वय अंदाजे ३२ वर्षे, ०२) रंग-सावळा,अंगाने-मजबुत, उंची-अंदाजे ०५ फुट, ०३) अंगावर निळसर रंगाची पॅन्ट,गुलाबी रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची अंडरविअर असल्याचे सांगण्यात आले असून या वर्णनाच्या व्यक्तीशी कोणाचा परिचय असेल तर पो.स्टे.संभाजीनगर – ०२४४६-२२३०३६, तपासी अंमलदार – ९८२२५५५८४३ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
परळीच्या रेल्वे रुळावर अनोळखी मृतदेह आढळला ओळख पटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.