बीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाने काल पाठवलेल्या ३७३ संशयितांचा अहवाल आज सकाळी पावणे बारा वाजता प्राप्त झाला असून या अहवालात बीड तालुक्यात केवळ ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून ते तिघेही बीड शहरातील आहेत तर जिल्ह्यात १९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
आज आलेल्या अहवालात १९ पॉझिटिव्ह आले असून ३५४ जण निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ४, आष्टी ३, बीड ३, गेवराई २, केज ४ आणि पाटोदा तालुक्यात ३ रूग्ण आढळून आले आहेत तर पाच तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नाही.